Goa Crime: कुंपणच शेत खातं तेंव्हा..! अपघात झाला, चालक झाला गंभीर जखमी; संधी साधून कॉन्स्टेबलने पळवले 8 लाखांचे दागिने

Police constable arrested for stealing gold jewellery: हणजूण पोलीस पथकाने रॉबर्ट जीपचा चालक असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलला अटक केली आहे.
Police constable arrested for stealing gold jewellery
Police constable arrested for stealing gold jewelleryDainik Gomantak
Published on
Updated on

हणजूण पोलीस पथकाने रॉबर्ट जीपचा चालक असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलला अटक केली आहे. अपघातातील पीडित व्यक्तीचे सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली. साईश पार्सेकर असे अटक करण्यात आलेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, २५ जानेवारी रोजी हणजूण येथील रॉकी गॅरेजजवळ भीषण अपघात झाला होता. या अपघातात जेस्टर रॉड्रिग्ज (२७) हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Police constable arrested for stealing gold jewellery
Goa Crime: म्हापसा हादरलं! अपार्टमेंटजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ; मृत्यूचं कारण अद्याप गुलदस्त्यात

दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळावरून पीडिताच्या सामानातून सोन्याचे ब्रेसलेट आणि सोन्याचे कडे असा सुमारे ८ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयाची सुई कॉन्स्टेबल साईश पार्सेकर याच्याकडे वळली. चौकशीअंती त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

Police constable arrested for stealing gold jewellery
Goa Crime: संतापजनक! 80 वर्षाच्या वृद्धेवर वारंवार अत्याचार; 50 वर्षीय आरोपीचा जामीन न्यायालयाने फेटाळला

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, अधिक माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com