400 attacks by Israel in Gaza in 24 hours Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hamas War: इस्रायलचे गाझामध्ये 24 तासांत 400 हल्ले, युद्ध सुरू झाल्यापासून एका दिवसात सर्वाधिक मृत्यू

Ashutosh Masgaunde

400 attacks by Israel in Gaza in 24 hours, deadliest in one day since war began: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा हा 20 वा दिवस आहे. आतापर्यंतच्या ताज्या माहितीनुसार, या युद्धात सुमारे 6500 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

दरम्यान, इस्रायल हमासवर वेगाने हवाई हल्ले करत आहे. अवघ्या 24 तासांत इस्रायलने गाझामध्ये केलेल्या 400 हून अधिक हल्ल्यांत 700 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

'न्यूयॉर्क टाईम्स'ने गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, इस्रायलने २४ तासांत ४०० हून अधिक हवाई हल्ले केले.

यामध्ये 756 जणांचा मृत्यू झाला होता. युद्ध सुरू झाल्यापासून एका दिवसात मारल्या गेलेल्या लोकांच्या बाबतीत हा आकडा सर्वाधिक आहे.

एका दिवसात 400 हवाई हल्ले केल्याचे इस्रायलने स्वतः मान्य केले आहे. मात्र, केवळ 47 लोक मारले गेल्याचे इस्रायलने म्हटले आहे. याच्या एक दिवस आधी इस्रायलने हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करून 320 हवाई हल्ले केले होते.

दरम्यान, इस्रायलने गाझावर केलेल्या बॉम्बहल्ल्यात गेल्या 24 तासांत 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे हमासच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत 756 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 344 मुले आहेत.

अधिकार्‍यांनी सांगितले की, गाझाच्या दक्षिणेकडील भागाला अलीकडील हल्ल्यांचा सर्वाधिक फटका बसला आहे. 7 ऑक्टोबरपासून आतापर्यंत 6500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 2704 मुले आहेत.

याआधी मंगळवारी रात्री इस्रायलच्या लष्कराने सीरियाच्या लष्करी तळावरही हल्ला केला होता. यामध्ये आपले 8 सैनिक मरण पावल्याचे सीरियाने म्हटले आहे.

आयडीएफने म्हटले आहे की, गोलान हाइट्समधील इस्रायली समुदायावर सीरियाकडून रॉकेट डागण्यात आले, त्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, इराणवरील हवाई हल्ल्याबाबत इस्रायलच्या संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) चे प्रवक्ते डॅनियल हगरी यांनी सांगितले की, इराण पश्चिम आशियाला अस्थिर करत आहे.

इराणवरील हवाई हल्ल्यांबाबत ते म्हणाले की, सध्या आमचे लक्ष गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT