Goa Maritime Conclave: चौथी गोवा मेरिटाईम कॉन्क्लेव्ह (GMC - गोवा सागरी परिषद) 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मार्गदर्शन करणार आहेत.
बुधवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. नेव्हल वॉर कॉलेज, गोवा येथे हे संमेलन होणार आहे. भारतीय नौदलाद्वारे याचे आयोजन केले जात आहे.
संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, या संमेलनात बांगलादेश, कोमोरोस, इंडोनेशिया, मादागास्कर, मलेशिया, मॉरिशस, म्यानमार, सेशेल्स, सिंगापूर, श्रीलंका आणि थायलंड इत्यादी राष्ट्रांच्या समावेश आहे.
नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार हिंदी महासागरातील या 12 किनारी देशांचे नौदल प्रमुख, नौदलाचे वरिष्ठ प्रतिनिधी यांचे यजमानपद भूषवतील.
निवेदनात म्हटले आहे की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे या संमेलनाचे प्रमुख पाहुणे असतील. त्यांनी त्यास मान्यता दिली आहे. या द्विवार्षिक कार्यक्रमाला ते संबोधित करतील.
यापुर्वी 2017, 2019 आणि 2021 मध्ये गोवा मेरिटाईम कॉनक्लेव्ह झाले होते.
नौदल प्रमुख, सागरी एजन्सीजचे प्रमुख यांना विचार विनिमय करता यावा, समकालीन आणि भविष्यातील सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी चर्चा करता येईल, सागरी भागीदारी तसेच परस्पर संवाद वाढविण्यासाठी सहकारी धोरणे तयार करता यावीत, यासाठीचे हे एक व्यासपीठ आहे.
‘Maritime Security in the Indian Ocean Region: Converting Common Maritime Priorities into Collaborative Mitigating Frameworks’ ही यावर्षीची थीम आहे.
हिंद महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षेसाठी सर्वसमावेशक आणि सहयोगी प्रयत्नांची गरज लक्षात घेऊन हे तयार करण्यात आले आहे.
दरम्यान, या संमेलनात येणाऱ्या मान्यवरांना मेक इन इंडिया प्रदर्शनात भारताच्या स्वदेशी जहाजबांधणी उद्योगाचे साक्षीदार होण्याची आणि स्वदेशी युद्धनौकांची क्षमता तसेच 'डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेसेल' (DSRV) पाहण्याची संधी मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.