36 Talibanis killed by Afghanistan Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाणिस्तानचा तालिबान्यांवर प्रतिहल्ला, 36 जणांचा खात्मा

तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तानातील(Afghanistan) बहुतेक महामार्ग हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेने काहीदिवसांपूर्वी अफगाणिस्तानातून(Afghanistan) आपले सैन्य माघार घेण्याचा निर्णय घेतला अमेरिकेचे(America) अध्यक्ष जो बायडन(Jo Biden) यांनी याची घोषणा देखील केली होती तब्बल 20 वर्षानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य निघून गेल्यामुळे अफगाणिस्तानात तालिबानचे(Taliban) वर्चस्व वाढताना दिसत आहे.तालिबानी अतिरेक्यांचा असा दावा आहे की अफगाणिस्तानच्या 90 टक्के भागांवर त्यांच्या सैन्याने कब्जा केला आहे. अफगाण सैन्य आपल्या भागांना तालिबान्यांच्या तावडीतून मुक्त करण्याचा सतत प्रयत्न करीत आहे.

अशातच अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी गेल्या काही दिवसांत तालिबानांवर सतत हल्ले केल्याचे समोर येत आहेत . अफगाण सैन्याने कंधारजवळ 36 तालिबान्यांना ठार मारल्याचा दावा केला आहे.(36 Talibanis killed by Afghanistan)

अफगाणिस्तानाबरोबर सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षाच्या दरम्यान तालिबानही बरेच दवे करताना दिसत आहे. काहीदिवसांपूर्वीच तालिबानने म्हटले आम्ही (तालिबानने) अफगाणच्या उत्तरेकडील भागातील गाझियाबाद जिल्ह्यातील पोलिस मुख्यालय ताब्यात घेतले आहे.यासह 80 अफगाण सुरक्षा रक्षकांना तालिबानमध्ये सामील करून घेतले असून तालिबान्यांनी गाझियाबाद जिल्ह्यात अफगाण दलांकडून जप्त केलेली शस्त्रे आणि दारूगोळाची छायाचित्रेही जाहीर केली.

अमेरिकेने इतक्या दिवसांनी अफगाणिस्तानातून आपले सैन्य वापस बोलवल्यानंतर तालिबानी अधिक आक्रमक झालेले पाह्यला मिळत आहेत. आणि अफगाणिस्तानातल्या बऱ्याच भागावर त्यांनी कब्जाही केला आहे. तालिबान्यांनी पाकिस्तान, इराण, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान यांना जोडणार्‍या हेरात, फरहा, कंधार, कुंदझ, ताखर आणि बदाखशान प्रांतातील प्रमुख महामार्ग व सीमा चौकीही ताब्यात घेतल्या आहेत.

वास्तविक, तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तानातील बहुतेक महामार्ग हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बर्‍याच ठिकाणी त्यांना यात यशही आले आहे.आता तालिबान्यांचे लक्ष कंधार महामार्ग जो देशातील मुख्य मानला जातो तो ताब्यात घेण्यावर आहे.

दरम्यान गुरुवारी कंधार प्रांताच्या स्पिन बोल्डक जिल्ह्यात एका सश्त्र बंदूकधारी गटाने 100 हून अधिक नागरिकांना मारहाण करत त्यांची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्याची माहिती एका न्यूज संस्थेने दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार एरियर? जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीबाबत जाणून घ्या ताजे अपडेट

FIR Case: 2017 च्या विमान प्रकरणात मोठा न्यायालयीन निर्णय; राज्यपालांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील मागणी फेटाळली

Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

Pakistan Players Central Contract: "सॅलरी पाहिजे? मग आधी खेळायला शिका!", मोहसिन नक्वीने रोखले खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स; काढला नवा फतवा

Healthcare Facilities: दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मोठा बदल! नर्सिंग महाविद्यालय जुन्या हॉस्पिसिओ इमारतीत हलविणार

SCROLL FOR NEXT