सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी कंधार(Kandahar) प्रांताच्या स्पिन बोल्डक जिल्ह्यात एका सश्त्र बंदूकधारी गटाने 100 हून अधिक नागरिकांना(Civilians) मारहाण करत त्यांची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्याची माहिती एका न्यूज संस्थेने दिली होती. (100 Civilians killed in Afghanistan)
मात्र आता अफगाणिस्तानच्या(Afghanistan) गृह मंत्रालयाने या अहवालाची पुष्टी करत नागरिकांच्या हत्येसाठी तालिबान्यांना(Taliban) जबाबदार धरले आहे. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते मीरवाइस स्टॅनेकजाई म्हणाले, “त्यांच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तान च्या आदेशावरून स्पिन बोल्दकच्या काही भागात निरपराध अफगाणांच्या घरांवर हल्ला केला, घरे लुटली आणि 100 निष्पाप लोकांना शहीद केले. "यातून क्रूर शत्रूचा खरा चेहरा उलगडला,"
गेल्याच आठवड्यात तालिबान्यांनी स्पिन बोल्डक ताब्यात घेतला होता आणि तेथे मोठ्या प्रमाणात तोडफोडही केली होती. फ्रान्स 24 ने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये अनेक तालिबान सदस्यांनी शहरात गदारो घातल्याचे स्पष्ट दिसत आहे तसेच तालिबान्यांनी तेथील घरेही लुटली. तसेच ते बाजारपेठेत मोटारसायकलवरूनही फिरत होते आणि जिथून पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात थेट प्रवेश होऊ शकतो अशा भागात लूटमार करतानाही दिसले. त्यांनी एका घरात तालिबानचे झेंडेही उंचावले होते.
याविषीयी बोलताना कंधारच्या प्रांतीय परिषदेच्या सदस्याने सांगितले आहे की, अज्ञात बंदूकधारकांनी ईदच्या एक दिवस आधी त्याच्या दोन्ही मुलांना घराबाहेर नेले आणि नंतर त्यांची हत्या केली.
स्पिन बोल्डक येथील एक रहिवासी फिरकी मोहम्मद अफगान याने असे सांगितले की त्याची मुले कोणत्याही सैन्य गटाशी संबंधित नव्हते. "ते म्हणतात की ते तालिबानशीही संबंधित नव्हते, परंतु ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांना अटक केली गेली पाहिजे आणि त्यांना न्यायालयात आणले जावे,"
अफगाणच्या सुरक्षा एजन्सीनुसार अनेक नागरिकांचे मृतदेह अद्याप स्पिन बोल्डकमध्ये जमिनीवर पडले आहेत.दरम्यान, तालिबान्यांनी नागरिकांच्या हत्येमध्ये कोणताही सहभाग नाकारला आहे. (एएनआय)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.