अमेरिकेचा अफगाणिस्तानात हवाई हल्ला; 5 तालिबानी अतिरेकी ठार

अमेरिकेच्या सैन्याने कंधार येथे हवाई हल्ला केला, ज्यामध्ये पाच तालिबानी ठार झाले
US airstrikes in Afghanistan; 5 Taliban militants killed
US airstrikes in Afghanistan; 5 Taliban militants killedDainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या तीन दिवसांत अफगाणिस्तानच्या(Afghanistan) वेगवेगळ्या प्रांतांमध्ये अमेरिकेने (America)केलेल्या हल्ल्यात किमान 5 तालिबानी(Taliban) अतिरेकी ठार झाले आहेत. एका स्थानिक पत्रकाराच्या म्हणण्यानुसार त्याला अफगाणिस्तानच्या विविध अधिकाऱ्यांकडून ही माहिती मिळाली असून अफगाण पत्रकार बिलाल सरवारीने ट्वीटमध्ये असा दावा केला आहे की अमेरिकन सैन्य दलांनी तालिबान्यांना लक्ष्य करुन हवाई हल्ले केले आहेत. (Air Strike)

सरवारीने ट्विट केले की, गेल्या 52 तासांत अमेरिकन हवाई दल सातत्याने अफगाणिस्तानाच्या अनेक प्रांतांमध्ये हवाई हल्ले करीत आहे.हेलमंडच्या गरमासिर जिल्ह्यात तालिबानच्या एका गाडीही लक्ष्य केले गेले होते. मागील काही दिवसांपासून अमेरिकेने आपले सैन्य वापस बोलवायला सुरवात केली आहे आणि त्यानंतर अफगाणिस्तानच्या संरक्षण दलांशी तालिबानने तीव्र युद्ध पुकारले आहे आणि आता अमेरिका तालिबान्यांवर हल्ला करत आहे.

वृत्तसंस्था एएनआय च्या म्हणण्यानुसार, सरवारी यांनी ट्विट केले की अमेरिकेच्या सैन्याने कंधार येथे हवाई हल्ला केला, ज्यामध्ये पाच तालिबानी ठार झाले असून सरवारीने असेही वृत्त दिले की, वॉर्डन प्रांतातील सय्यदाबाद जिल्ह्यात अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात तालिबानी तोफखाना देखील उध्वस्त झाला आहे.

US airstrikes in Afghanistan; 5 Taliban militants killed
अफगाणिस्तानात 100 निष्पाप लोकांची हत्या, तालीबान्यांवर आरोप

याव्यतिरिक्त, शहा वाली कोट जिल्ह्यात दोन अमेरिकन हवाई हल्ले झाले असून यामध्ये तालिबानच्या दहा सशस्त्र लष्करी ट्रकना लक्ष्य केले आहे. गेल्या बुधवारी अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन म्हणाले की, अमेरिकेच्या सैन्यदलाचे लक्ष अफगाणिस्तानात दहशतवादविरोधी वातावरण निर्माण करणे अशे त्याचबरोबर अफगाणिस्तानात तालिबान व्यतिरिक्त अमेरिका अल कायदावरही नजर ठेवेल.

त्याचबरोबर आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार अमेरिकेने हे मान्य केले आहे की अफगाणिस्तानात तालिबान्यांचे वर्चस्व वाढत आहे. या युद्धग्रस्त देशातील निम्मे भाग या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात आले आहेत. अफगाणिस्तानच्या 419 जिल्हा केंद्रांपैकी 212 केंद्र आता तालिबानच्या ताब्यात आहेत, असे अमेरिकेच्या एका वरिष्ठ जनरलने सांगितले. अमेरिकन सैन्याची माघार सुरू झाल्यापासून तालिबान रणनीतिकदृष्ट्या वाढत आहे.

दरम्यान अफगाणिस्तानात 20 वर्ष चाललेल्या संघर्षानंतर अमेरिकन सैन्य आता देश सोडून जात आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले की, 95 टक्क्यांहून अधिक सैन्य परत पाठविण्यात आले आहे. अमेरिकन अफगाण मिशन 31 ऑगस्ट रोजी संपेल, अशी घोषणा अध्यक्ष जो बिडेन यांनी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com