Plane crashes in Tanzania Dainik Gomantak
ग्लोबल

Plane crashes in Tanzania: टांझानियात प्रवासी विमान तलावात पडून 19 ठार

लँडिंग करताना व्हिक्टोरिया तलावात विमानाला अपघात

गोमन्तक डिजिटल टीम

Plane crashes in Tanzania : आफ्रिका खंडातील टांझानिया येथे एका प्रवासी विमानाला अपघात झाला आहे. विमानतळावर लँडिग करताना झालेल्या या अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. लँडिंगवेळी हे विमान येथील लेक व्हिक्टोरिया या तलावात दुर्घटनाग्रस्त झाले. सुदैवाने स्थानिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे विमानातील अनेकांचा जीव वाचवता आला.

या विमानात एकूण 43 प्रवासी प्रवास करत होते. यातील 26 जणांना रूग्णालयात दाखल केले होते. अपघातानंतरही या विमानाचे दोन्ही पायलट सुरक्षित होते. त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी कॉकपिटमधून संवादही साधला होता. पण येथील पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार संवाद साधल्यानंतर या वैमानिकांचा मृत्यू झाला असावा.

बचावपथक आणि स्थानिक मच्छिमारांनी तत्काळ येथे बचावमोहिम राबवली. स्थानिकांनी सांगितले की, अचानक झालेल्या या अपघाताने धक्का बसला. आम्ही विमान पाण्यात पडताना पाहिले. येथे बरेच लोक नातेवाईकांची वाट पाहत होते. त्यातील अनेक जण रडू लागले, अनेक जण ओरडत होते. कुणाला काही कळायच्या आत सर्व काही घडले.

स्थानिक मच्छिमारांनी सांगितले की, विमानाचा पाठिमागचा दरवाजा उघडल्याने अनेक प्रवाशांचा जीव वाचवता आला. त्या दरवाजातून अनेकांना बाहेर काढता आले.

टांझानिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे विमान तलावात कोसळले. हे विमान वायव्येकडील शहर बुकोबा (Bukoba Airport) येथे उतरणार होते, हा तलाव बुकोबा विमानतळाच्या अगदी जवळ आहे. हा आफ्रिकेतील सर्वात मोठा तलाव आहे. टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष सुलुहु हसन यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या अपघातानंतर याबाबतचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: गोव्यातून पावसाची एक्झिट नाहीच! मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याचा 'यलो अलर्ट'

Sawantwadi Crime: इन्सुली नाक्यावर 94 लाख तर, वेर्ले गावात 22 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त

Goa Live News: क्लास सुरु असताना विद्यार्थ्याच्या अंगावर पडला फॅन, विद्यार्थी जखमी; पर्वरी सत्तरीतील सरकारी शाळेतील घटना

पाकड्यांची मस्ती काय उतरेना... 'तुला 3 चेंडूत आऊट करेन!' पाकच्या गोलंदाजाचं अभिषेक शर्माला थेट आव्हान Video Viral

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

SCROLL FOR NEXT