China Will Send Monkey In Space: चीन माकडांना पाठवणार अंतराळ स्थानकात

शुन्य गुरूत्वाकर्षणात माकडांचे वर्तन, प्रजनन यावर अभ्यास करणार
China Will Send Monkey In Space
China Will Send Monkey In SpaceDainik Gomantak

China Will Send Monkey In Space: चीनने आता माकडांना अंतराळात पाठवण्याची योजना आखली आहे. चीनने नव्याने साकारलेल्या तियानगाँग अंतराळ स्थानकात (Tiangong space station) या माकडांना पाठविण्याचे ठरवले आहे.

China Will Send Monkey In Space
Viral Video: पाच वर्षानंतर टांझानियात मोठा विमान अपघात; 49 प्रवासी होते विमानात

शुन्य गुरूत्वाकर्षणात ही माकडे कशी राहतात, याचा अभ्यास चीनला करायचा आहे. ही माकडे तेथील वातावरणात कशी राहतील, कसे प्रजनन करतील, त्यांच्या प्रजननात काही बाधा तर येत नाही ना, याचा अभ्यास चीनला करायचा आहे. तथापि, माकडांचे अन्न आणि त्यांच्यामुळे निर्माण होणारा कचरा हे चीनसमोरील मोठे आव्हान असणार आहे.

चिनच्या साऊथ मॉर्निंग पोस्टने याबाबतची बातमी दिली आहे. चिनी विज्ञान अकादमीचे एक शास्त्रज्ञ झांग लू यांनी म्हटले आहे की, हा प्रयोग अत्यंत कमी गुरुत्वाकर्षणात होणार आहे. अंतराळात हे जीव कसे वागतात, हे पाहिले जाईल. त्यातून मानवाचीही समज वाढेल. शुन्य गुरूत्वाकर्षणात माकडांच्या प्रजनन तंत्रावर काय परिणाम होतो, ते तपासायचे आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की, अंतराळात या माकडांना अंतराळवीरांशी कसे संपर्कात ठेवायचे, यावर जास्त लक्ष द्यावे लागणार आहे.

China Will Send Monkey In Space
USA: अहो अश्चर्यम! 56 वर्षीय महिलेने सून आणि मुलाच्या बाळाला दिला जन्म

या बातमीत म्हटले आहे की, या शोधकाळात माकडांना देण्यात येणाऱ्या अन्नाविषयी आणि त्यांनी निर्माण केलेल्या कचऱ्यापासून कशी सुटका करून घ्यायचे हे प्रश्न गहन असणार आहेत. अंतराळ स्थानकात माकडांना तणावमुक्त आणि आरामात राहणे कठिण जाईल, असे दिसते.

चिनच्या तियानगाँग अंतराळ स्थानकात सध्या दोन पुरूष आणि एक महिला अंतराळवीर आहेत. चेन डोंग, काई जुजे आणि लियू यांग अशी त्यांची नावे आहेत. हे अंतराळवीर जूनमध्ये स्पेस स्टेशनमध्ये पोहचले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com