Artificial Intelligence Competition In USA Dainik Gomantak
ग्लोबल

America: 09+10 = 21, अमेरिकेतील 21 वर्षीय हॅकरने सिद्ध केले 'एआय'ही चुकू शकतो

अमेरिकेतील एका स्पर्धेत 21 वर्षीय हॅकरने एआय सिस्टममधील त्रुटी उघड केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

कृत्रिम बुद्धीमत्ता (Artificial Intelligence) वरदान की शाप याचं कोडं सोडवण्यात तांत्रिक क्षेत्रातील तज्ञ प्रयत्न करत आहेत. एआयच्या योग्य वापराबाबत अजूनही अनेक क्षेत्रातील लोक असमाधानी आहेत. जगभरातील हॅकर्सकडून एआयचा गैरवापर होण्याच्या शक्यतेबाबत विविध प्रयोग केले जात आहेत.

एआयला बोलण्यात फसवून त्याच्याकडून कोणते काम करून घेता येईल यावर विदेशात स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. अमेरिकेतील अशाच एका स्पर्धेत 21 वर्षीय हॅकरने एआय सिस्टममधील त्रुटी उघड केली आहे.

विदेशातील अशा स्पर्धांमध्ये हजारो हॅकर्स जनरेटिव्ह एआय सिस्टममधील त्रुटी उघड करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत आयोजित एका स्पर्धेत 21 वर्षीय हॅकरने अल्गोरिदमच्या मदतीने एआयला फसवण्यात यश मिळवले आहे. या तरूण हॅकरने एआयला 9 + 10 = 21 हे मान्य करण्यास भाग पाडले आहे. भाषा मॉडेल (Language Model) चा वापर करून त्याने ही करामत केलीय अशी माहिती समोर आली आहे.

नुकतीच लास वेगास, USA येथे DEF CON हॅकिंग कॉन्फरन्स पार पडली. या स्पर्धेत उपस्थित असलेले हजारो हॅकर्स AI चुकीची गणिती आकडेमोड करू शकतो का? याबाबत AI च्या त्रुटी उघड करण्यासाठी प्रयत्न करत होते.

स्पर्धेतील 156 हून अधिक स्पर्धेक सहभागी झाले होते, त्यांनी लॅपटॉपवर 50 मिनिटे घालवत त्यांचे कसब दाखवले. या दरम्यान अल्फाबेट इंकच्या गुगल, मेटा प्लॅटफॉर्म इंक आणि ओपनएआय सारख्या 8 मॉडेल्ससाठी चाचणी करण्यात आली.

विशेष म्हणजे या स्पर्धेच्या आयोजनात व्हाईट हाऊसचाही सहभाग होता. भाषा मॉडेल्स किंवा एलएलएमशी संबंधित उणीवा दूर करण्यासाठी कंपन्या काम करू शकतात का हे पाहणे हा या एआय स्पर्धेचा उद्देश होता.

दरम्यान, लॉर्ड लँग्वेज मॉडेलबाबत जगभरातील कंपन्यांची उत्सुकता वाढत आहे. काही कंपन्यांनी त्यांच्या कामात AI तंत्रज्ञानाचाही समावेश केला आहे. संशोधक एआय मॉडेल्सचा गैरवापर टाळण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT