BJP Meeting on UP cabinet News, Uttar Pradesh Politics News, JP Nadda News,  Dainik Gomantak
देश

जेपी नड्डासह भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक, यूपी मंत्रिमंडळावर 'मंथन'

योगींनी रात्री उशिरापर्यंत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

दैनिक गोमन्तक

यूपीमध्ये (Uttar Pradesh) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या पुनर्नियुक्तीला गुरुवारी औपचारिक रित्या मान्यता दिली जाणार आहे. बुधवारी दिल्लीत रात्री उशिरापर्यंत योगी आदित्यनाथयांच्या टीमला आकार देण्यासाठी संपूर्ण स्क्रिप्ट लिहिली गेली म्हटलं तरी वावग ठरणार नाही. योगींनी रात्री उशिरापर्यंत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), धर्मेंद्र प्रधान आणि बीएल संतोष यांच्याशी विधीमंडळ पक्षाची बैठक आणि मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येणाऱ्या नावांबाबत सविस्तर चर्चा केली आहे. (Yogi Adityanath He has discussed the UP cabinet at JP Naddas house)

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) पुष्कर सिंह धामी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून योगी थेट दिल्लीला पोहोचले होते. यूपी सदनात काही काळ विश्रांती घेतल्यानंतर योगी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी रवाना झाले होते. आदित्यनाथ यांची भेट आधी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होणार होती, मात्र नंतर जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला शाहही उपस्थित राहिले होत. (BJP Meeting on UP cabinet News)

खरं तर, लखनौमध्ये गुरुवारी दुपारी 4 वाजता लोक भवनात होणाऱ्या भाजप (BJP) विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत योगी यांची विधिवत नेता म्हणून निवड केली जाणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्सही आता संपणार आहे. ही सर्व प्रक्रिया केंद्रीय पर्यवेक्षक अमित शहा आणि सह-पर्यवेक्षक रघुवर दास यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानही यावेळी उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेते ते उपमुख्यमंत्री निवडीसह विविध विषयांवर चर्चा झाली आहे. यासोबतच मंत्रिमंडळात सामील होणार्‍या चेहऱ्यांवरही चर्चा झाली. काही मंत्र्यांची पुनरावृत्ती होणे बंधनकारक असले तरी त्यांचे विभागही बदलले जाऊ शकतात.

पंतप्रधानांशी चर्चा करून शाह शेवटची यादी आणतील

नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात महत्त्वाचे स्थान देण्याची जय्यत तयारीही सुरू आहे. मात्र, भावी मंत्र्यांच्या नावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अंतिम शिक्कामोर्तब करतील. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतर, अंतिम यादीसह शाह गुरुवारी दुपारी लखनौला पोहोचणार आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर ते पक्षाच्या प्रदेश मुख्यालयात येणार असून तेथे ते काही प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले जात आहे. विधीमंडळ पक्षाच्याच बैठकीत उपमुख्यमंत्र्यांच्या नावांबाबतही चित्र स्पष्ट होईल. 2017 मध्ये याच बैठकीत केशव प्रसाद मौर्य आणि डॉ. दिनेश शर्मा यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.

बुधवारपासूनच आमदारांची लखनौला पोहोचण्याची लगबग सुरू झाली होती. सर्व आमदारांनी सकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह आणि प्रदेश महासचिव संघटन सुनील बन्सल यांचीही भेट घेतली आहे. अनेकांनी मंत्रिमंडळात समावेशाचा दावाही मांडला आहे.

आता सरकार स्थापनेचा दावा करणार

भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची औपचारिक निवड झाल्यानंतर, काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेतील आहे आणि त्यावेळी सरकार स्थापनेचा दावा करतील असे म्हटले आहे. अटलबिहारी वाजपेयी एकना इंटरनॅशनल स्टेडियमवर शुक्रवारी दुपारी 4 वाजता होणाऱ्या भव्य शपथविधी समारंभात राज्यपाल योगी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत जवळपास 50 मंत्री शपथ घेऊ शकतात असेही म्हटले आहे. या सोहळ्यात पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, 12 राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती लावणार आहेत. या भव्य सोहळ्याचे 70 हजारांहून अधिक लोक प्रत्यक्ष साक्षीदार असणार आहेत.

आमदार आज काय झोपणार नाहीत

निवडणुकीच्या निकालानंतर टीम योगीमध्ये स्थान मिळवण्यासाठी भाजपचे सर्व आमदार सातत्याने प्रयत्न करत होते. आणि गुरुवारी अंतिम निर्णयाची वेळ येऊन ठेपली आहे. गुरुवारी रात्री विधीमंडळ पक्षाची बैठक संपल्यानंतर आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची यादी निश्चित होताच संबंधित आमदारांना याची माहिती दिली जाणार आहे. आणि मग अशा स्थितीत सर्व आमदारांना गुरुवारी रात्री झोप लागणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT