हवामानाने घेतला युटर्न, पुढील 5 दिवस दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता

आज गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
Weather Updates
Weather UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील बहुतांश भागात उन्हाळ्याने (Summer) आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. रात्रीचे तापमानही वाढू लागले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये हवामानाचे तापमान 37 अंशांच्या जवळ पोहोचले आहे, तर गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानसह देशातील अनेक भागांत पारा 40 अंशांच्या आसपास आहे. हवामान खात्यानुसार (IMD) येत्या काही दिवसांत आकाश पुर्णत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

आकाशात ढग नसल्यामुळे सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर पडत आहेत, त्यामुळे तापमानात वाढ होत आहे. आजही दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय आज गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

Weather Updates
उत्तर गोव्यासह दक्षिण गोव्यात 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता

दरम्यान, कडक ऊन असताना आज अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आजपासून ते शनिवारपर्यंत (26 मार्च) मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे, पुढील 5 दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर आज आणि उद्या याच भागांमध्ये विजांच्या विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता आहे.

Weather Updates
अवकाळी पावसामुळे डिचोलीत झाडांची पडझड, घरांचे नुकसान

दरम्यान अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवस, केरळ आणि माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com