देशात कोरोनाचा संसर्ग (covid19) वाढत असताना दुसरीकडे मात्र कर्नाटकात (Karnataka) भाजपमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं चित्र दिसत आहे. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा (Chief Minister Yeddyurappa) यांचे वाढते वय पाहता नेतृत्व बदलाचा विचार केला जात असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र या सर्व बातम्यांना येडीयुरप्पा यांनी आपल्या हटके अंदाजात उत्तर दिलं आहे. ''भाजप नेतृत्वाने मला मुख्यमंत्री पद सोडण्याचे सांगितल्यास मी त्याच दिवशी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपुर्द करेन.'' मात्र ते बोलताना दुसरा पर्याय नसल्याचे सांगायला विसरले नाहीत. दुसरीकडे येडीयुरप्पा यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील तसेच आगामी निवडणूकही त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल असंही त्यांनी सांगितलं.(Yeddyurappas difficulty increases Discussions on leadership change abound)
''पक्ष नेतृत्वाने मला राजीनामा देण्यास सांगितल्यास मी त्वरित मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन. परंतु मला वाटतं कर्नाटकात भाजपला दुसरा पर्याय नाही. दिल्लीतील पक्ष नेतृत्वाला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदावर राहणार. ज्या दिवशी पक्ष नेतृत्व मला राजीनामा देण्यास सांगेल त्याच दिवशी राजीमाना देईन आणि राज्याच्या विकासकामासाठी दिवसरात्र काम करेन,'' असे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी सांगितले आहे.
''मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा नाही. त्यांनी केवळ वक्तव्य केले आहे. पक्ष जो निर्णय देणार तो सर्वांना मान्य असणार आहे. कारण ते पक्ष नेतृत्वाचा आदेश मानणारे नेते आहेत,'' असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सीएम नारायण यांनी यावेळी सांगितले.
2018 मध्ये पार पडलेल्या निवडणूकीत भाजप 110 जागा मिळवत पहिल्या क्रमांकाच पक्ष बनला होता. मात्र बहुमताचा आकडा गाठू न शकल्यामुळे सत्तेपासून दूर रहावे लागले होते. त्यासाठी त्यांनी 6 अपक्ष आमदारांना गळही घातली होती. मात्र त्यांच्या पाठिंब्यावर सरकार फार काळ टिकू शकणार नाही याचा अंदाज आल्यानंतर जेडीएस आणि कॉंग्रेसकडे मोर्चा वळवला होता. यालाच 'ऑपरेशन कमल' नाव देण्यात आलं होतं. सात आमदारांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले त्यानंतर त्यापैकी पाच आमदार पुन्हा एकदा निवडूनही आले होते. कर्नाटकमध्ये अखेर कॉंग्रेस-जेडीयूचं सरकार पाडून भाजपाने सत्ता मिळवली. त्यानंतर येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.