Yogi Adityanath Dainik Gomantak
देश

'मुलींची छेड काढला तर गाठ थेट यमराजाशी...' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सक्त इशारा

Manish Jadhav

Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी गोरखपूर दौऱ्यावर होते. विकास आणि लोककल्याण आणि कायदा-सुव्यवस्था यावर बोलताना योगी म्हणाले की, कायदा संरक्षणासाठी आहे.

कायद्याला हाताशी धरुन व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न कोणालाही करता येणार नाही. कायदा सुरक्षेसाठी आहे. एखाद्या महिलेची किंवा मुलीची कोणी छेड काढली तर त्याची थेट रवानगी यमराजाकडे होईल.

त्याला यमराजाकडे पाठवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आपल्याला राज्यात भयमुक्त वातावरण तयार करायचे आहे.

वास्तविक, मानसरोवर रामलीला मैदानावर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी 343 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते.

ते पुढे म्हणाले की, 'सरकार कोणाशीही भेदभाव न करता सर्व लोकांना योजनांचा लाभ देण्यासाठी कटिबद्ध आणि समर्पित आहे. सरकारबरोबरच नागरिकांनीही (Citizens) आपले कर्तव्य बजावले तर विकास कामात अडथळे आणणारे आपोआप उघडे पडतील.'

'विकासकामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही'

विकासात अडथळे निर्माण करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्याचे काम सरकार वेगाने करत असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. विकासकामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. विकासकामे करण्यासाठी प्रत्येकाला कटिबद्ध राहावे लागेल.

विकास ही गोरखपूर आणि उत्तर प्रदेशची ओळख आहे. सहा वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशबद्दल लोकांची काय धारणा होती? विकासाची काय अवस्था होती हे सर्वांना माहीत आहे, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

त्याचबरोबर, आदित्यनाथ यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मजबूत कायदेशीर व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. व्यवस्थेत अडथळा आणण्यासाठी कायद्याचा गैरवापर करण्यास कोणालाही परवानगी दिली जाणार नाही यावर त्यांनी जोर दिला.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सत्ताधारी भाजपने अनेकदा योगी सरकारच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळणे ही त्यांची उपलब्धी असल्याचे अधोरेखित केले आहे.

दुसरीकडे, नुकतीच मुलींच्या छेडछाडीसंबंधी एक घटना समोर आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडित मुलगी, जी इयत्ता 11वीची विद्यार्थिनी होती आणि दुसरी मुलगी तिच्या सायकलवरुन जात होती, तेव्हाच मागून एक दुचाकी त्यांच्याजवळ आली आणि त्यांच्याजवळून जात असताना दुचाकीस्वाराने त्यांची छेड काढली.

दरम्यान, सेहबाज आणि त्याचा भाऊ अरबाज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांनी मुलींची छेड काढली होती. पोलिस या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आंबेडकरनगरचे पोलीस अधीक्षक अजित सिन्हा यांनी रविवारी पीटीआयला सांगितले की, "तीन आरोपींना रविवारी वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले जात होते. याचदरम्यान या तिघांनी चालत्या वाहनातून उडी मारली. त्यांनी पोलिसांची रायफल हिसकावून आमच्या पथकावर गोळीबार केला."

प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन आरोपींच्या पायाला गोळ्या लागल्या, तर तिसर्‍याचा पाय फ्रॅक्चर झाला. तिघांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे," असेही त्यांनी पुढे सांगितले.

दुसरीकडे, आरोपींवर आयपीसी कलम 302 (हत्या) आणि 354 (महिलेच्या विनयभंगासाठी हल्ला) आणि POCSO (लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

SCROLL FOR NEXT