Yogi Adityanath: अतीक अहमद आणि अशरफच्या हत्येनंतर CM निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ

Yogi Adityanath: आपल्या सर्व कार्यक्रमात बदल केले आहेत.
CM Yogi Adityanath
CM Yogi AdityanathDainik Gomantak
Published on
Updated on

Yogi Adityanath: उत्तरप्रदेशमधील गॅंगस्टार अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफच्या हत्येनंतर उत्तरप्रदेशमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी दर दोन तासांनी या हत्येबाबतचा रिपोर्ट देण्याबाबत आदेश दिल्याची माहीती समोर आली आहे. याबरोबर त्यांनी आपल्या सर्व कार्यक्रमात बदल केले आहेत.

5 कालिदास मार्गावर असलेल्या मुख्यमंत्री निवासस्थानावर आज कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. मुख्यमंत्री योगींनी अधिकाऱ्यांना फिल्डमध्ये सर्तकता ठेवण्याचे आणि या हत्येबाबत दर दोन तासांनी रिपोर्ट देण्याचे निर्देश दिले आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये शांतता राखली गेली पाहिजे, नागरिकदेखील मदत करत आहेत, सामान्य जनतेला कोणताही त्रास होऊ नए याची काळजी घेतली पाहिजे असेही मुख्यमंत्री योगींनी म्हटले आहे.

याबरोबरच जनतेला संबोधताना योगींनी म्हटले आहे की, कायद्यासोबत कोणीही कोणत्याही प्रकारे खेळू नये. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जे अफवा पसरवतील त्यांच्याविरुद्ध सक्त कारवाई केली जाईल असे योगींनी म्हटले आहे.

CM Yogi Adityanath
YS Bhaskar Reddy: आंध्रचे CM जगन मोहन रेड्डी यांच्या काकांना सीबीआयकडून अटक, माजी खासदाराच्या हत्येचा...

दरम्यान, शनिवारी उशीरा रात्री अतीक आणि अशरफच्या हत्येनंतर मुख्यमंत्री निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश पोलिसचे डीजीपी आरके विश्वकर्मा आणि एडीजी (लॉ अॅंड ऑर्डर) प्रशांत कुमार यामनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com