Yogi Adityanath Death Threat Case: योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी; एका मॅसेजने उडाली युपी पोलिसांची झोप

एका अज्ञात व्यक्तीने 112 क्रमांकावर मॅसेज करून ही धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.
Yogi Adityanath:
Yogi Adityanath:Dainik Gomantak
Published on
Updated on

Yogi Adityanath Death Threat Case: यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने 112 क्रमांकावर मॅसेज करून ही धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. 

योगी यांना मिळालेल्या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. योगी यांना धमक्या मिळाल्यानंतर सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशन परिसरात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम 506 आणि 507 आयपीसी आणि 66 आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार 23 एप्रिलच्या रात्री व्हॉट्सअॅप क्रमांक 112 वर एक मॅसेज आला. हा मॅसेज संपर्क अधिकारी शिखा अवस्थी यांनी उचलला होता, ज्यामध्ये योगी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 

त्यानंतर त्यांनी या मॅसेजचा स्क्रिन शॉट घेतला आणि तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. या प्रकरणी आता लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धमकी देणारी व्यक्ती कोण आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. 

Yogi Adityanath:
Kedarnath Yatra 2023: केदारनाथमध्ये बम बम भोलेचा गजर! उघडले गेले मंदिराचे दरवाजे, पाहा व्हिडिओ
  • फेसबुकवर धमक्याही दिल्या होत्या

सीएम योगी आदित्यनाथ यांना अशी धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही , योगी सरकारने उचललेल्या कठोर पावलांमुळे त्यांना अनेकदा धमक्या आल्या आहेत. आठवडाभरापूर्वीही त्यांना फेसबुकच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही फेसबुक पोस्ट बागपतच्या अमन रझा यांच्या प्रोफाईलवरून शेअर करण्यात आली होती, या पोस्टमध्ये सीएम योगी यांना गोळ्या घालण्याची धमकीही देण्यात आली होती, त्यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याप्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com