Will PM Kisan Samman Nidhi Yojana will be doubled before 5 state elections including Goa  Dainik Gomantak
देश

गोव्यासह 5 राज्यांच्या निवडणुकीपूर्वी PM किसान योजनेचा हप्ता होणार दुप्पट?

15 डिसेंबरला PM किसान योजनेचा हप्ता 2000 ऐवजी 4000 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे, त्यापैकी एक म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना (PM kisan Samman Nidhi Scheme). यूपी, पंजाबसह अनेक राज्यांतील निवडणुकांनंतर (Goa Elections ) केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. पुढील वर्षी 2022 मध्ये यूपी, पंजाब गोवासह अनेक राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार 15 डिसेंबरला येणारा हप्ता 2000 ऐवजी 4000 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

तुम्हाला 6000 रुपयांऐवजी 12000 रुपये मिळू शकतात

केंद्र सरकार दीर्घकाळापासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची रक्कम दुप्पट करण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 12000 रुपये मिळू शकतात. पंजाब आणि यूपीच्या निवडणुकीपूर्वी या वेळी ही रक्कम दुप्पट होण्याची शक्यता शेतकऱ्यांना वाटत आहे.

बिहारच्या कृषीमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांशी केली चर्चा

या बैठकीत पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट करण्यावरही चर्चा झाली. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र माध्यमांमध्ये शेतकऱ्यांची रक्कम दुप्पट करण्याची चर्चा आहे.

लाभार्थ्यांची यादी जाहीर

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 10 वा हप्ता 15 ते 25 डिसेंबरपर्यंत पैसे येऊ शकतो. सरकारने योजने अंतर्गत लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. 15 ते 25 डिसेंबर दरम्यान पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधीही ट्रान्सफर केले जाऊ शकतात. मोदी सरकारने यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था केली आहे. त्यामुळे तुम्ही ताबडतोब यादीत तुमचे नाव देखील तपासू शकता.

असा मिळवू शकता फायदा

जर तुम्हालाही पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल , तर तुम्हाला यासाठी त्वरित नोंदणी करावी लागेल. अन्यथा ही संधी तुमच्या हातून जाईल. या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पूर्ण करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी पंचायत सचिव, पटवारी किंवा स्थानिक कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी स्वतः देखील नोंदणी करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cruise Tourism: क्रूझवरुन गोव्यात 67,594 प्रवासी, 9 महिन्यांत कमावलं 4.82 कोटींचं उत्पन्न; मुरगाव बंदर बनलं क्रूझ पर्यटनाचं केंद्र

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

The Hundred League: 13 चेंडूत 50 धावा...! ‘द हंड्रेड’मध्ये आरसीबीच्या खेळाडूंचा धमाका; जेकब बेथेलने मोडला 136 वर्ष जुना रेकॉर्ड

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

SCROLL FOR NEXT