भारतातील 'या' ठिकाणी दिवाळींनंतर खेळली जाते शेणाची होळी

दिवाळीचा एक भाग म्हणून साजरा केला जाणारा गोरेहब्बा (Gorehabba), शेणाचा सण तुम्हाला माहीत आहे का?
Play dung holi here in India after Diwali
Play dung holi here in India after DiwaliDainik Gomantak
Published on
Updated on

भारत (India) हा विविधतेने भरलेला देश आहे. विविध जाती, धर्म, चालीरीती, संस्कृती यांचा अनोखा संगम इथे पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वीच देशाच्या अनेक भागांमध्ये दिव्यांचा सण म्हणजेच दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. पण दिवाळीचा एक भाग म्हणून साजरा केला जाणारा गोरेहब्बा (Gorehabba), शेणाचा सण तुम्हाला माहीत आहे का? या सणाचे नाव जितके विचित्र आहे, तितकाच हा उत्सव साजरा करण्याची पद्धतही विचित्र आहे.

Play dung holi here in India after Diwali
कोरोनावर आता घरीच उपचार करता येणार, अँटीव्हायरल गोळीला लकरच मिळणार मंजूरी

तमिळनाडू (Tamil Nadu) आणि कर्नाटकच्या (Karnataka) सीमेवर असलेल्या गुमतापुरा (Gumatapura) गावात हा अनोखा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये लोक एका ठिकाणी शेण गोळा करतात. यानंतर ते एकमेकांवर फेकून हा सण साजरा करतात. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गावातील लोक एकमेकांवर शेण फेकताना दिसत आहेत. त्याचबरोबर लोक या सणाचाही भरपूर आनंद घेत आहेत. चला तर मग आधी हा व्हिडिओ पाहूया.

'गोरेहब्बा' सणाचे हे दर्शन तुम्हाला होळीसारखीच अनुभूती देईल. इथे रंगांऐवजी लोक एकमेकांना शेणात भिजवत आहेत. तसे, यूपी-बिहारच्या अनेक भागात मातीची होळीही खेळली जाते. गुमतापुरा गावचा हा उत्सव मात्र वेगळाच आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा उत्सव 100 वर्षांचा आहे. आजूबाजूचे लोकही यात सहभागी होतात. असे मानले जाते की शेणखताने लोकांचे अनेक रोग बरे होतात. यासोबतच व्यक्ती निरोगी राहते.

मात्र, या उत्सवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. टोमॅटिनो फेस्टिव्हलची ही देशी आवृत्ती असल्याचे काहीजण म्हणतात. हा सण स्पेनमध्ये साजरा केला जातो, ज्यामध्ये लोक एकमेकांवर टोमॅटो फेकतात. त्याचबरोबर उत्तर भारतातही असा सण साजरा केला जातो, असे काही लोकांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com