Uttar Pradesh Crime News Dainik Gomantak
देश

प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली, घरात कोंडलेल्या पत्नीच्या डोक्यात कट शिजला; झोपेच्या गोळ्या देऊन ओढणीने गळा आवळत पतीचा काटा काढला

Uttar Pradesh Crime News: काजलने पतीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकून खायला दिल्या. अनिलची शुद्ध हरपल्यानंतर प्रियकर आकाशसोबत बाईकवरुन त्याला शहराबाहेर घेऊन गेले.

गोमंतक ऑनलाईन टीम

उत्तर प्रदेश: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढला. मेरठमध्ये पत्नीने पतीचा खून केल्याची ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने पतीला सुरुवातीला झोपेच्या गोळ्या दिल्या नंतर ओढणीने गळा आवळून खून केला.

काजल आणि तिचा प्रियकर आकाश असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. आकाश काजलच्या घराशेजारी राहत होता तेथेच त्यांच्या प्रेमसंबंध सुरु झाल्याचे तपासात समोर आले आहे.

काजलने पती अनिलला झोपेच्या गोळ्या दिल्या यानंतर प्रियकरासोबत बाईकवरुन त्याला शहराबाहेर घेऊन गेले. तिथे ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला. खून केल्यानंतर मृतदेह ओढ्यात फेकून दिला.

अनिल कुमार असे खून झालेल्या ३२ वर्षीय युवकाचे नाव आहे. आठ वर्षापूर्वी त्याचा काजलसोबत विवाह झाला होता. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. दरम्यान, काजल घराशेजारी राहणाऱ्या आकाशच्या प्रेमात पडली. दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरु झाले. दोघांमध्ये संबंध अधिक वाढत गेले. एकदिवस काजल आणि तिचा प्रियकर आकाश अनिलला नको त्या अवस्थेत आढळून आले.

यानंतर संतापलेल्या अनिलने पत्नी काजलच्या घरातून बाहेर पडण्यावर बंदी घातली. यामुळे नाराज झालेल्या काजलच्या पतीला संपवण्याचा कट शिजला. २५ ऑक्टोबर रोजी काजलने पतीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकून खायला दिल्या. अनिलची शुद्ध हरपल्यानंतर प्रियकर आकाशसोबत बाईकवरुन त्याला शहराबाहेर घेऊन गेले.

अनिलला सिवालखास गंगनहर येथे घेऊन गेल्यानंतर तिथे ओढणीने आवळून त्याचा खून करण्यात आला. अजून त्याच्यात प्राण असताना अनिलला ओढ्याच्या पाण्यात फेकून देण्यात आले. यानंतर पत्नीने पती अनिल बेपत्ता झाल्याचा कांगावा करत पोलिस तक्रार दाखल केली. पोलिसांचा संशय बळावल्यानंतर पोलिसांनी काजल आणि आकशची चौकशी केली.

चौकशीअंती काजल आणि आकाश यांनी अनिलचा मृतदेह ओढ्यात फेकून दिल्याचे मान्य केले. त्यांच्या घरातून झोपेच्या गोळ्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी ओढ्यातून अनिलचा मृतदेह देखील ताब्यात घेतला असून, अधिक तपास मेरठ पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Love Horoscope: लग्नाचा विचार करताय? वृषभ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार गोडवा, सुरुवातीचे 6 महिने टाळावा 'हा' मोठा निर्णय

"कधीच विराटला बोलावलं नाही, बोलावणारही नाही!", 'Koffee With Karan'मध्ये कोहलीला 'नो एन्ट्री'; करण जोहरचं धक्कादायक विधान

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Ratnagiri: 'समुद्रस्नान' जीवावर बेतलं!गणपतीपुळे समुद्रात तीन पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

SCROLL FOR NEXT