Delhi Airport Technical Glitch: 800 फ्लाईट्सना विलंब, अनेक रद्द; दिल्ली विमानतळावर तांत्रिक अडचणीचा हजारो प्रवाशांना फटका

Delhi airport technical glitch: शनिवारी दुपारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, विमानतळावरील कामकाज पूर्वपदावर आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Delhi airport passengers affected
Delhi Airport Technical GlitchDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीचा मोठा फटका हजारो प्रवाशांना बसला. यामुळे विमानावरील सुमारे ८०० फ्लाईट्सना विलंब झाला तर अनेक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या.  शनिवारी (०८ नोव्हेंबर) विमानतळावरील कामकाज पूर्वपदावर आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) नियोजन प्रक्रिया निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे शुक्रवारी दिल्ली विमानतळावरील शेकडो फ्लाईट्सना फटका बसला. तर, अनेक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या.

शनिवारी दुपारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, विमानतळावरील कामकाज पूर्वपदावर आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. फ्लाईट बाबत माहितीसाठी प्रवाशांनी संबंधित विमान वाहतूक कंपन्यांच्या संपर्कात राहावे, अशी सूचना देण्यात आली आहे.

Delhi airport passengers affected
सुपारी गँगस्टर तिला गोळी घालू शकतो! पूजा नाईकला सुरक्षा देण्याची काँग्रेसची मागणी; कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात मंत्र्याचा हात??

स्वयंचलित संदेश प्रक्रियेत बिघाड झाल्याने याचा फटका हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीला बसला यामुळे स्वयंचलित प्रक्रिया बंद झाली व त्यासाठी मॅन्युएल पद्धतीचा वापर करण्यात आला. प्रक्रिया लांबल्याने गुरुवारी दुपारपासून सुमारे ८०० विमान उड्डाणे विलंबाने झाली तर  अनेक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या.

Delhi airport passengers affected
संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

दरम्यान, बिघाड झालेल्या प्रणालीत यापूर्वीही दोष असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे प्रक्रिया मंदावल्याचे निरीक्षण देखील नोंदविण्यात आले होते. मुख्यत: दिल्ली, मुंबई यासारख्या विमानतळावर याबाबत विशेष काळजी घेण्याची सूचना करण्यात आली होती.

स्वयंचलित संदेश प्रणालीद्वारे फ्लाईट्ची माहिती हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीकडे पाठवली जाते. ऐनवेळी ती बंद पडल्याने ही माहिती मॅन्युएल पद्धतीने करावी लागल्याने फ्लाईट्ला विलंब झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com