सुपारी गँगस्टर तिला गोळी घालू शकतो! पूजा नाईकला सुरक्षा देण्याची काँग्रेसची मागणी; कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात मंत्र्याचा हात??

Cash For Job Scam Goa: पूजाने पैसे गोळा करुन एका आयपीएस अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अभियंत्याला दिल्याचा आरोप तिने केला आहे.
Cash For Job Scam
Pooja Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्याला हादरवून सोडणाऱ्या कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात आयपीएस अधिकारी आणि बांधकाम खात्यातील वरिष्ठ अभियंत्याकडे पैसे दिल्याचा पुनरुच्चार पूजा नाईकने केला आहे. तसेच, या नोकरी घोटाळ्यात मंत्र्यांचा हात असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला असून, काँग्रेस नेते सुनील कंवठणकरांनी पूजाला सुरक्षा प्रदान करण्याची मागणी केलीये.

वर्षभर राज्यात गाजलेल्या कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात आता नव्याने माहिती समोर येत असताना या प्रकरणातील मुख्य संशयित पूजा नाईक हिच्या जीवाला देखील धोका असण्याची शक्यता काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आलीये.

पूजा या घोटाळ्यात सहभागी मंत्र्याचे नाव घेण्यापूर्वी गोव्यात वाढलेली गुन्हेगारी, गन संस्कृतीत एखादी सुपारी गँगस्टर पूजाला गोळी मारु शकतो, त्यामुळे तिला सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते सुनील कवठणकरांनी केली आहे.

Cash For Job Scam
Rawanfond Bridge: 'रावणफोंड उड्डाणपूल पूर्णपणे खुला करा'! नागरिकांची मागणी; गैरसोय होत असल्याने लोकांत नाराजी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी याप्रकरणात लक्ष घालून पोलिस महासंचालक यांना यासाठी सूचना करावी आणि पूजा नाईकला सुरक्षा दिली जावी, अशी मागणी कंवठणकरांनी केली आहे. राज्याला हादरवूण सोडणाऱ्या या नोकरी घोटाळ्यांत अनेकांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. राज्यातील अनेकांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले होते.

पूजा नाईकने मोठा आरोप केल्याने राज्यात खळबळ निर्माण झाली आहे. पूजाने पैसे गोळा करुन एका आयपीएस अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अभियंत्याला दिल्याचा आरोप तिने केला आहे. २४ तासांत या अधिकाऱ्यांनी पैसे परत न केल्यास सर्व पुराव्यासह मुख्यमंत्र्यांना माहिती देणार, असा इशारा पूजा नाईक यांनी दिला आहे. नोकरीसंबधित हा घोटाळा तब्बल १७ कोटी रुपयांचा असल्याचा दावा पूजाने केला आहे.

Cash For Job Scam
अग्रलेख: कोकणी, मराठी समजल्याशिवाय ग्राहकाला काय हवे हे बँकेतील कर्मचाऱ्याला कसे कळणार?

पैसे घेऊन सरकारी नोकरी लावण्याचे आमिषे देऊन अनेकांनी लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गोव्यात उघडकीस आला. २०१९ साली सुरु झालेल्या या प्रकरणात आत्तापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे आणि कनेक्शन समोर आले आहेत.

सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर देखील याप्रकरणी कारवाई करण्यात आली. दरम्यान, मुख्य संशयित पूज नाईकने नव्याने केलेल्या आरोपांमुळे खळबळ निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com