Former Prime Minister Rajiv Gandhi Dainik Gomantak
देश

Rajiv Gandhi: राजीव गांधी यांची जयंती 'सद्भावना दिवस' म्हणून का साजरी केला जातो?

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती 20 ऑगस्ट रोजी 'सद्भावना दिवस' म्हणून देशभर साजरी केली जाते.

दैनिक गोमन्तक

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची जयंती 20 ऑगस्ट रोजी 'सद्भावना दिवस' म्हणून देशभर साजरी केली जाते. खरं तर, सद्भावना दिवस हा सर्व भारतीयांमध्ये शांतता, राष्ट्रीय एकात्मता आणि सांप्रदायिक सौहार्दाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चिन्हांकित केला जातो. (Why is Rajiv Gandhi birth anniversary celebrated as Goodwill Day)

इंग्रजीत 'सद्भावना' म्हणजे goodwill.

सद्भावना दिवस राजीव गांधींच्या विकसित राष्ट्राच्या संकल्पनेला प्रोत्साहन देतो, ज्याचा त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांद्वारे प्रचार करण्याचा प्रयत्न केला होता. विविध धर्म आणि श्रद्धा असलेल्या लोकांनी देशात शांततेने राहावे आणि हिंसाचार टाळावा हा या दिवसाचा संदेश आहे असं म्हणायला हरकत नाही. सद्भावना दिवसाचा उद्देश समाजात जातीय सलोखा, एकता, बंधुता आणि प्रेम निर्माण करणे हाच आहे.

इतिहास

राजीव गांधी यांचा आधुनिक दृष्टिकोन देशाच्या विकासामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानातून दिसून आला. 1986 मध्ये, राजीव गांधी यांनी भारतातील उच्च शिक्षणाचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर केले होते.

त्यांनी 1986 मध्ये जवाहर नवोदय विद्यालय प्रणाली नावाची एक केंद्र सरकार-आधारित संस्था देखील सुरू केली ज्यामुळे समाजातील ग्रामीण भागाच्या उत्थानासाठी त्यांना इयत्ता 6 ते 12 पर्यंत मोफत निवासी शिक्षण देण्यात येते.

त्यांच्या प्रयत्नांमुळे, MTNL 1986 मध्ये सुरू करण्यात आली होती. ग्रामीण भागामध्ये दूरध्वनींची पोहोच वाढवण्यासाठी त्यांनी सार्वजनिक कॉल ऑफिस (PCOs) देखील तयार केले होते.

राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार

वयाच्या 40 व्या वर्षी राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले होते. तर 1992 मध्ये, नेत्याच्या स्मरणार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार सुरू केला. सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT