'कर्नाटकचे मुख्यमंत्री पद 2500 कोटी रुपयांचे', Congress नेत्याचा खळबळजनक दावा

Chief Minister Basavaraj Bommai: कर्नाटकात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे.
Chief Minister Basavaraj Bommai
Chief Minister Basavaraj Bommai Dainik Gomantak

Karnataka Politics: कर्नाटकात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेस नेते बीके हरिप्रसाद यांनी शुक्रवारी सांगितले की, 'मुख्यमंत्रीपद हे अत्यंत महागडे प्रकरण आहे.' भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्रीपदासाठी 2,500 कोटी रुपये उद्धृत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

रिपोर्टनुसार, ते म्हणाले, "मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक उमेदवार रांगेत उभे आहेत. त्यासाठी मोठी रक्कम मोजण्यासाठीही ते तयार आहेत. भाजपच्या (BJP) एका वरिष्ठ नेत्याच्या मते, मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवायची असेल तर 2,500 कोटी मोजावे लागतील." बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्याची चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरु आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्रीपदासाठी मोठी किंमत मोजावी लागत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्याने करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Chief Minister Basavaraj Bommai
जास्त प्रमाणात अंडी अन् मांस खाण्याने होतो लाइफस्टाइल डिसऑर्डर: कर्नाटक शैक्षणिक धोरण समिती

खरे तर, काँग्रेस (Congress) नेते भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांचा संदर्भ देत होते. यत्नल यांनी या वर्षी मे महिन्यात दावा केला होता की, 'काही लोकांनी आपल्याशी संपर्क साधून 2,500 कोटीमध्ये मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती.' त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी काही फसवणूक कंपन्या असे करतात असे त्यांनी सांगितले होते.

यत्नल पुढे म्हणाले होते की, 'राजकारणात एक गोष्ट जाणून घ्या, कोणाच्याही फंदात पडू नका. राजकारणात असे अनेक लोक तुम्हाला क्षणोक्षणी भेटतील जे तिकीट मिळवणे, दिल्लीला नेणे, सोनिया गांधी, जेपी नड्डा यांना भेटणे अशा चर्चा करुन फसवतील.'

Chief Minister Basavaraj Bommai
कर्नाटक उच्च न्यायालय न्यायाधीशांना बदलीची धमकी

तथापि, बीएस येडियुरप्पा यांची संसदीय पॅनेलमध्ये वर्णी लागल्यानंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व बोम्मई यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवू शकते, अशी अटकळ आहे. मात्र, नुकतेच भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांनी बोम्मई यांच्या हकालपट्टीच्या अफवा फेटाळून लावल्या. पुढील वर्षी कर्नाटकात निवडणुका होईपर्यंत बोम्मईच मुख्यमंत्री राहतील, असे ते म्हणाले.

Chief Minister Basavaraj Bommai
सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन झाल्यासच SC-ST कायदा लागू होईल: कर्नाटक उच्च न्यायालय

बोम्मई यांना हटवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केंद्रीय नेतृत्वाचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते निश्चितपणे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असेही ते म्हणाले. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री अश्वत नारायण म्हणाले की, "सध्याचे मुख्यमंत्री कायम राहतील. तेच आमचे मुख्यमंत्री असतील. या अफवा कुठून येत आहेत, माहीत नाही."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com