Kerala Politics: मुला-मुलींनी शाळेत एकत्र बसणे धोकादायक असल्याचा दावा केरळमधील एका मुस्लिम नेत्याने केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो. वास्तविक, हे वक्तव्य केरळ इंडियन युनियन मुस्लिम लीगचे (IUML) सरचिटणीस प्रभारी पीएमए सलाम यांनी केले आहे.
दरम्यान, मुला-मुलींना वर्गात एकत्र बसण्याची परवानगी देणे "धोकादायक" असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या नेत्याचे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा राज्य सरकार जेंडर न्यूट्रॅलिटी (Gender Neutrality) शिक्षण प्रणाली लागू करण्यासाठी प्रयत्न करत आहे. जेंडर-न्यूट्रल ही एक कल्पना आहे, जिथे मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव केला जात नाही.
तसेच, सलाम यांनी केरळ (Kerala) सरकारच्या जेंडर न्यूट्रॅलिटी धोरणांवर टीका करताना म्हटले की, "हे धोकादायक आहे. मुला आणि मुलींना वर्गात एकत्र बसण्याची काय गरज आहे? तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती का करत आहात किंवा केवळ अशा संधी का निर्माण करत आहात. विद्यार्थ्यांचे (Students) अभ्यासापासून लक्ष विचलित होईल."
ते पुढे म्हणाले, "जेंडर न्यूट्रॅलिटी हा धार्मिक मुद्दा नसून एक नैतिक मुद्दा आहे. सरकार जेंडर न्यूट्रॅलिटी यूनिफॉर्म विद्यार्थ्यांवर लादण्याचा प्रयत्न करत आहे. जेंडर न्यूट्रॅलिटीमुळे विद्यार्थ्यांची दिशाभूल होईल. सरकारला (Government) आम्ही हे धोरण परत घेण्यास सांगू."
यापूर्वी, मुस्लिम संघटनांनी राज्य सरकारला राज्यातील शैक्षणिक संस्थांवर "जेंडर न्यूट्रॅलिटी विचार लादण्यापासून" रोखले होते. डाव्या विचारसरणीच्या नेतृत्वाखालील सरकार शैक्षणिक संस्थांमध्ये उदारमतवादी विचारसरणी लागू करण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप त्यांनी केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.