Monu Manesar|Haryana Violence Dainik Gomantak
देश

Nuh Violence: कोण आहे मोनू मानेसर? ज्याच्यामुळे हरियाणा पेटलेय

Monu Manesar: काही गोरक्षकांनी त्यांचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर भिवानीतील लोहारू येथे बोलेरो कारमध्ये दोघांना जिवंत जाळण्यात आले.

Ashutosh Masgaunde

Who is Monu Manesar? Person Behind Haryana Violence: स्वतःला गोरक्षक म्हणणारा मोनू मानेसर आज देशभर चर्चेत आहे. मोनू मानेसरचे खरे नाव मोहित यादव असून तो बजरंग दलाशी संबंधित आहे.

हरियाणातील नूह (Nuh) येथे सोमवारी ब्रजमंडल शोभायात्रेदरम्यान झालेल्या हिंसाचारासाठी मोनू मानेसरला जबाबदार धरण्यात येत आहे.

या शोभायात्रेपूर्वी मोनूने सोशल मीडियावर एका व्हिडिओतून शोभयात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मेवातमधील काही लोक संतप्त झाले. शोभायात्रा नूहमध्ये प्रवेश करताच दगडफेक आणि गोळीबार सुरू झाला आणि त्यातूनच पुढे हिंसाचाराला तोंड फुटले.

Monu Manesar

कोण आहे मोनू मानेसर?

काही वर्षांपूर्वी मोनू मानेसरने एका मुलाखतीमध्ये असा दावा केला होती की, "2012 मध्ये पोलिसांनी रक्ताने माखलेला ट्रक ताब्यात घेतला होता. त्यात गाईंचे मृतदेह होते. त्या दिवसापासून मी ठरवले होते की, एकही गाय मरू देणार नाही."

28 वर्षांचा मोनू मानेसर गुरुग्राम-रेवाडी-नुह भागात सुमारे 50 गोरक्षकांच्या संघटनेचा म्होरक्या आहे. मोनू असा दावा करातो की तो पोलिसांना गो तस्करांना पकडण्यात मदत करतो.

जुनैद-नसीर हत्याकांडातील आरोपी

जुनैद आणि नसीर यांच्या हत्येतील (Junaid-Nasir Massacre) मोनू मानेसर हा मुख्य आरोपी आहे. हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यात १६ फेब्रुवारीला बोलेरो गाडीत दोन मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले होते. हे मृतदेह राजस्थानमधील गोपालगढ घाटमिका गावातील जुनैद आणि नसीर यांचे होते.

तपासात हरियाणातील काही गोरक्षकांनी त्यांचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर भिवानीतील लोहारू येथे बोलेरो कारमध्ये दोघांना जिवंत जाळण्यात आले.

यामध्ये अनेक गौ रक्षकांची नावे समोर आली. ज्यामध्ये मोनू मानेसर उर्फ ​​मोहित यादव यांचं नाव प्रमुख आरोपी म्हणून आहे.

हरियाणातील हिंसाचाराशी मोनूचा संबंध

मोनू मानेसर याने बृजमंडळ शोभायात्रेत सहभागी होण्याची घोषणा केल्यानंतरच तणावाला सुरुवात झाली.

विश्व हिंदू परिषदेने सोनूला यात्रेत येण्यास मनाई केली असतानाही मोनू यात्रेत सहभागी झाल्याची अफवा पसरली आणि दोन्ही बाजूंनी दगडफेक आणि गोळीबारास सुरुवात झाली.

यासोबतच हा व्हिडिओ पाहून राजस्थानचे भरतपूर पोलिसांचे पथकही मोनू मानेसरला पकडण्यासाठी नूह येथे पोहोचले, मात्र मोनू यात्रेत सहभागीच झाला नसल्याने रिकाम्या हाताने परतले.

Monu Manesar

मोनू यूट्यूबवरही प्रसिद्ध

मोनू मानेसर यूट्यूबवरही खूप प्रसिद्ध आहे. यूट्यूबवर त्यांचे 2.05 लाख सबस्क्राइबर्स आहेत. तो त्याच्या यूट्यूब चॅनलवर (YouTube) गोरक्षणाशी संबंधित व्हिडिओ शेअर करतो.

नुकतेच मोनू मानेसरने नूह येथील विहिंपच्या (Vishwa Hindu Parishad) ब्रिजमंडल यात्रेत सहभागी होणार असल्याचे जाहीर करणारा व्हिडिओ अपलोड केला होता. तेथूनच या हिंसाचाराची ठिणगी पडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT