Violence Erupted In Haryanas Nuh After a Mob Tried to Stop Vishva Hindu Parishad procession:
सोमवारी विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती दुर्गा वाहिनी आणि बजरंग दलाच्या वतीने काढण्यात आलेल्या ब्रजमंडल 84 कॉर्प्स शोभा यात्रेदरम्यान झालेल्या दगडफेकीत आणि गोळीबारात एक होमगार्ड जवान शहीद झाला.
याचबरोहबर अनेक पोलिसांसह सुमारे 24 लोक जखमी झाले. यावेळी यात्रेत सहभागी लोकांसोबतच पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. यावेळी परिसरातील हजारो नागरिकांनी आपले घर सोडत इतर ठिकाणी आश्रय घेतला आहे.
दरम्यान, दंगलखोरांनी जाळपोळ सुरू केली. अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. जातीय तणावामुळे संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू करून बुधवारपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यासोबतच जिल्ह्याच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत.
या हिंसाचारात सुमारे 12 पोलीस जखमी झाले असून त्यापैकी आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
जखमींमध्ये होडलचे पोलीस उपअधीक्षक सज्जन सिंग यांच्या डोक्यात आणि एका निरीक्षकाच्या पोटात गोळी लागली आहे. एका व्हिडिओ क्लिपमध्ये किमान चार गाड्या जळताना दिसत आहेत. आणखी एका व्हिडिओमध्ये पोलिसांच्या दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. क्लिपमध्ये गोळीबाराचा आवाजही ऐकू येतो.
पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नूह येथील मुस्लिम बहुल शहर असलेल्या नल्हार येथील नल्हेश्वर महादेव मंदिरापासून यात्रा सुरू होताच समाजातील काही तरुणांनी दगडफेक आणि घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
दुपारपासून सायंकाळपर्यंत चाललेल्या या गोंधळात सुमारे 24 जण जखमी झाले. सर्वांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोळी लागल्याने होमगार्ड जवान नीरज यांचा मृत्यू झाला. नीरज गुरुग्राम पोलिस दलासह घटनास्थळी पोहोचला होता. नूह जिल्हा प्रशासनाने परिस्थिती हाताळण्यासाठी इतर जिल्ह्यांतून पोलिस दलाला पाचारण केले.
विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad) आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनीने सोमवारी ब्रजमंडल यात्रा काढण्याची घोषणा केली होती.
गेल्या तीन वर्षांपासून ही यात्रा काढण्यात येत आहे. ही यात्रा नुह येथून फिरोजपूर झिरका मार्गे सुरू होऊन पुनहाना येथील सिंगार गावात असलेल्या मंदिरात पोहोचणार होती.
दुपारी दीडच्या सुमारास नुह येथील नल्हाड शिव मंदिरातून फिरोजपूर झिरकाकडे निघालेली ही मिरवणूक शहीदी पार्कवर येताच तेथे आधीच काही समाजातील तरुण जमा झाले होते.
ते समोरासमोर येताच दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. काही वेळातच दगडफेक सुरू झाली. मिरवणुकीसोबत असलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र जमाव नियंत्रणाबाहेर गेला. जमावात सामील असलेल्या हल्लेखोरांनी काही वाहने पेटवून दिली.
यावेळी दंगलखोरांनी एक खासगी बस लुटली. त्यातील प्रवाशांना खाली उतरवले. यानंतर दंगलखोरांनी बस घेऊन अनाज मंडी येथील सायबर पोलीस ठाणे गाठले.
याठिकाणी बसने आधी पोलीस ठाण्याचे गेट तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो अयशस्वी ठरल्याने त्यांनी पोलीस ठाण्याच्या भिंतीवर चढून ती पाडली.
पोलिस ठाण्यात उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनासह चार खासगी वाहने जाळण्यात आली. दंगलखोरांनी पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या वाहनांचेही नुकसान केले. तसेच पोलीस ठाणे पेटविण्याचा प्रयत्न केला.
घटना घडली त्यावेळी सायबर स्टेशनमध्ये फक्त तीन-चार पोलीस होते, त्यांनी आपला जीव वाचवून पळ काढला.
दुपारपासून सुरू झालेला हा हिंसाचार सोशल मीडियावर व्हायरल होताच नुहच्या गावातील लोकही मोठ्या संख्येने शहराकडे रवाना झाले. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली.
दंगलखोरांनी बळजबरीने दुकाने बंद करून वाटेत लोकांशी गैरवर्तनही केले. त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांनी मार्केटमधील दोन-तीन दुकाने पेटवून दिली.
नूह येथील काली मंदिरावरही नराधमांनी दगडफेक केली. यामुळे मंदिराचा पुजारी गंभीर जखमी झाला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.