Pilot Ashutosh Shekhar Dainik Gomantak
देश

अयोध्येला पहिले प्रवासी विमान घेऊन जाणारे कोण आहेत पायलट आशुतोष शेखर? वर्ल्ड रेकॉर्ड आहे नावावर

Pilot Ashutosh Shekhar: अयोध्येत तयार झालेल्या भव्य राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची वेळ जवळ आली आहे.

Manish Jadhav

Pilot Ashutosh Shekhar: अयोध्येत तयार झालेल्या भव्य राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची वेळ जवळ आली आहे. 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. मात्र त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबरला म्हणजेच आज अयोध्येत अनेक मोठ्या घोषणा केल्या. येथील रोड शोनंतर पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील रेल्वे स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन त्यांनी केले. या उद्घाटनानंतर, इंडिगो प्रवासी विमानाने दिल्लीहून उड्डाण केले आणि आता ते अयोध्येला पोहोचले आहे. या प्रवासी विमानाचे सारथ्य कॅप्टन आशुतोष शेखर यांनी केले. फ्लाइटच्या टेकऑफच्या घोषणेमध्ये ते म्हणाले की, 'मी भाग्यवान आहे की इंडिगोने मला या विशेष विमानाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. ही आमच्यासाठी आणि आमच्या संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. तुमचा आमच्यासोबतचा प्रवास आनंददायी असेल अशी आशा आहे.''

पायलट आशुतोष शेखर हे बिहारचा रहिवासी

दरम्यान, आम्ही तुम्हाला कॅप्टन आशुतोष शेखर यांच्याबद्दल सांगणार आहोत. कॅप्टन आशुतोष यांच्या फेसबुक प्रोफाईलनुसार, आशुतोष हे बिहारचे रहिवासी असून त्यांनी पाटणा येथील सेंट केर्न्स स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. अत्यंत अनुभवी पायलट असण्यासोबतच आशुतोष यांच्या नावावर एक विश्वविक्रमही आहे.

हायस्ट स्पीड फ्लाइटचा वर्ल्ड रेकॉर्ड!

कॅप्टन आशुतोष यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ते 1996 मध्ये विद्यार्थी पायलट म्हणून नागरी विमानचालनात सामील झाले. त्यांना 11,000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. ते 2015 पासून 5 वर्षांपासून लाइन ट्रेनर आहेत आणि 2020 मध्ये ऑडिट पायलट म्हणून इंडिगो येथे फ्लाइट ऑपरेशन्स सेफ्टी टीममध्ये सामील झाले. डॉमेस्टिक रुटवर सर्वाधिक वेगाचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. डॉमेस्टिक रुटवर विश्वविक्रम करणारे ते पहिले भारतीय वैमानिक आहेत.

पीएम मोदींचे खास

कॅप्टन आशुतोष शेखर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास मानले जातात. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन आशुतोष यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. विशेष म्हणजे, कॅप्टन आशुतोष यांनी 18 ऑगस्ट 2023 रोजी त्यांच्या Instagram अकाऊंटवर यासंबंधी पोस्टही केली होती. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे मुख्य विश्वस्त कामेश्वर चौपाल यांचेही कॅप्टन आशुतोष शेखर यांच्या कुटुंबाशी जुने नाते आहे. काही दिवसांपूर्वी कामेश्वर चौपाल पाटणा इथे आशुतोष यांच्या घरी पोहोचला होते आणि त्यांनी त्यांच्या आई-वडिलांची भेट घेतली होती. आशुतोष शेखर यांनी त्यांच्या या भेटीचा फोटो इन्स्टावर शेअरही केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT