PM Modi
PM ModiDainik Gomantak

PM Modi: मुख्यमंत्रिपदावर नव्या चेहऱ्यांच्या नियुक्तीवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, म्हणाले...

PM Modi: भारतीय जनता पक्षाने नुकत्याच जिंकलेल्या हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांसाठी मुख्यमंत्रीपदासाठी पूर्णपणे नवीन चेहरे निवडून राजकीय पंडितांना आश्चर्यचकित केले.

PM Modi: भारतीय जनता पक्षाने नुकत्याच जिंकलेल्या हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांसाठी मुख्यमंत्रीपदासाठी पूर्णपणे नवीन चेहरे निवडून राजकीय पंडितांना आश्चर्यचकित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सरकारची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक राज्यांमध्ये अशा नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आता खुद्द पंतप्रधान मोदी यावर उघडपणे बोलले.

दरम्यान, इंडिया टुडेशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी भाजपच्या या ट्रेंडबद्दल सांगितले. पीएम मोदी म्हणाले की, ''हा नवीन ट्रेंड नाही. खरे तर भाजपमधील या प्रथेचे मी सर्वात मोठे उदाहरण आहे. मी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवडून आलो तेव्हा मला प्रशासकीय अनुभव नव्हता आणि विधानसभेवर निवडूनही गेलो नव्हतो. होय, हे नवीन ट्रेंडसारखे दिसू शकते, कारण आज इतर बहुतेक पक्ष घराणेशाहीचे पक्ष आहेत.''

PM Modi
"70 वर्षांची सवय इतक्या सहजासहजी सुटणार नाही," तीन राज्यांतील विजयानंतर PM Modi यांची काँग्रेसवर जहरी टीका

घराणेशाही असलेल्या पक्षांना फटकारताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''घराणेशाही असलेल्या पक्षांना हे लोकशाही विचारमंथन कठीण वाटते. एकाच वेळी अनेक पिढ्यांचे नेतृत्व तयार करण्याची क्षमता भाजपमध्ये आहे. भाजपच्या अध्यक्षांकडे बघा दर काही वर्षांनी तुम्हाला नवीन चेहरे दिसतील. आमचा केडर आधारित पक्ष आहे, जो स्पष्ट ध्येय घेऊन चालतो. आम्ही सर्वांनी तळागाळातील कार्यकर्ते म्हणून सुरुवात केली आणि समर्पण आणि कठोर परिश्रमातून समोर आलो. या बांधिलकीमुळे खासकरुन तरुणांना भाजपशी कनेक्ट व्हावसं वाटतं.''

PM Modi
Rahul Gandhi: 'केंद्रात नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल तर केसीआर...', राहुल गांधींचा तेलंगणात हल्लाबोल!

पीएम मोदी पुढे म्हणाले की, ''लोकशाहीत नवीन पिढीला आणि नवीन नेतृत्वाला संधी देणे खूप महत्वाचे आहे. या लोकशाही विचारमंथनामुळेच लोकशाही फुलते. या लोकशाही मंथनानेच आमचा पक्ष चैतन्यशील बनतो आणि आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आकांक्षा आणि आशांची ज्योत तेवत ठेवतो. मेहनतीच्या जोरावर आपणही पक्षात चांगल्या स्थानी येऊ शकतो, असे मला वाटते. आमच्या पक्षाला वेगवेगळे प्रयोग करण्याची सवय आहे. गुजरातमध्ये आम्ही सर्व नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात निवडले. दिल्लीत आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व नवीन चेहऱ्यांची निवड केली.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com