Panchkula News: सध्या गोव्यात पर्यटन हंगाम जोरात सुरू आहे. देशविदेशातून पर्यटक गोव्याकडे येत आहेत. पण, अशा पर्यटनाच्या हंगामात बऱ्याचदा एखादे कुटूंब गोवा ट्रिप एंजॉय करत असताना त्यांच्या राहत्या घरात चोरी झाल्याचे प्रकार उघडकीस येत असतात. असाच प्रकार हरियाणातील पंचकुला येथे उघड झाला आहे.
पंचकुला येथील एक कुटूंब गोव्यात एंजॉय करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर 'साफ' केले आहे. यात या चोरट्यांनी घराच्या ड्रॉईंग रूममध्ये बसून आधी मद्यपान केले.
त्यानंतर दहा लाखाचे दागिने आणि 50 हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटे फरार झाले. हरियाणातील पंचकुला सेक्टर 12 मधील घर क्रमांक 694 मध्ये हा प्रकार घडला.
दारू पिऊन चोरट्यांनी शांतपणे ही चोरी केली आहे. घरमालक कुटुंबासह गोव्याला गेले होते. घरमालकाच्या माहितीवरून पोलिलांनी गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी तपास केला आहे.
सेक्टर 12 मधील घर क्रमांक 694 मध्ये राहणारे लोहित यांनी सांगितले की, ते कुटुंबासह गोव्याला गेले होते. 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी तिची मोलकरीण घरासमोर फरशी साफ करण्यासाठी आली असता तिला घराचा दरवाजा उघडा दिसला.
त्यांनी तत्काळ या प्रकरणाची माहिती समोरच्या व्यक्तीला दिली. त्याचवेळी मोलकरणीने लोहितलाही फोन करून दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली.
दुसऱ्या दिवशी 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता लोहित कुटुंबीयांसह घरी पोहोचले असता त्यांना घराच्या मुख्य गेटचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील स्वयंपाक घर, पूजा खोली व इतर खोल्यांमधील सामान विखुरलेले होते.
घरातील खोल्यांमध्ये कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम गायब होती. याशिवाय इतरही काही वस्तू गायब असल्याचे आढळून आले. लोहितने सांगितले की, जाण्यापूर्वी त्याने निम्म्याहून अधिक सोन्याचे दागिने बँकेत ठेवले होते.
घराच्या ड्रॉईंग रूममध्ये दारूच्या बाटल्या आणि ग्लास होते. दारूची बाटली अर्धी रिकामी होती. चोरीच्या वेळी चोरट्यांनी एकत्र दारू प्यायली आणि नंतर हा गुन्हा केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सध्या पोलिस शेजारच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत. त्यातून दोन ते तीन दिवसात घराजवळून जाणाऱ्या लोकांमधून आरोपींची ओळख पटवली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.