'When Rakesh Roshan landed on the Moon', Mamata Banerjee's tongue slipped after the success of Chandrayaan-3. Dainik Gomantak
देश

Chandrayaan-3: "शर्मांचे नाव रोशन केले, वाह दीदी वाह", चंद्रयान 3 च्या वक्तव्यावरून ममता बॅनर्जी ट्रोल

एका यूजरने लिहिले की, "आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, ममता जी. अंतराळवीर बनून चंद्रावर उतरल्याबद्दल राकेश रोशन यांचे खूप खूप अभिनंदन."

Ashutosh Masgaunde

'When Rakesh Roshan landed on the Moon', Mamata Banerjee's tongue slipped after the success of Chandrayaan-3:

भारताने पाठवलेल्या चांद्रयान 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यावर देशभरात आनंदाची लाट उसळली. याचा भारतीयांना खूप अभिमान वाटत आहे.

चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर सोशल मीडिया फोटो आणि व्हिडिओंचा पूर आला होता. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत लोकांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आणि देशवासीयांचे अभिनंदन केले.

त्याचवेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वास्तविक, चांद्रयान 3 च्या यशानंतर ममता बॅनर्जी बोलत होत्या आणि त्यांनी भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा (Rakesh Sharma) यांचे नाव घेण्याच्या जागी चुकून चित्रपट निर्माते राकेश रोशन यांचे नाव घेतले.

यानंतर सोशल मीडियावर नेटकरी ममता बॅनर्जी यांची चांगलीच खील्ली उडवत आहे. यावेळी एका यूजरने यावर प्रतिक्रिया देताना, 'वाह दीदी वाह' अशी कमेंट केली आहे.

ममता बॅनर्जी राकेश शर्माऐवजी राकेश रोशन म्हणाल्या

चांद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंगनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये ममता बॅनर्जी भारताकडून यापूर्वी अंतराळात गेलेल्या राकेश शर्मा यांच्या कामगिरीबद्दल बोलत होत्या.

ममता बॅनर्जी यांना म्हणयचे होते की, राकेश शर्मा जेव्हा अंतराळात पोहोचले होते तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना विचारले होते की, 'वरून भारत कसा दिसतो?'

पण ममता बॅनर्जी यांची येथेच चूक झाली आणि राकेश शर्माऐवजी त्यांनी चित्रपट निर्माते राकेश रोशन यांचे नाव घेतले. ममता बॅनर्जी यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली.

ममता बॅनर्जी यांचे हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला होता. सोशल मीडिया यूजर्सनी राकेश शर्मा यांच्या चेहऱ्यावर राकेश रोशन यांचा चेहरा सुपरइम्पोज केलेले फोटो शेअर केले आणि त्यांचे अभिनंदन केले.

एका यूजरने लिहिले की, "आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, ममता जी. अंतराळवीर बनून चंद्रावर उतरल्याबद्दल राकेश रोशन यांचे खूप खूप अभिनंदन."

याआधी बुधवारी राजस्थानचे क्रीडा मंत्री अशोक चंदना यांनी भारताच्या ऐतिहासिक मिशन चांद्रयान-३ चे चंद्रावर सुरक्षित लँडिंग केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

यादरम्यान त्यांची जीभ घसरली. आणि त्यांनी अंतराळयानातील प्रवाशांना अभिवादन केले.

पत्रकारांशी बोलताना चंदना म्हणाल्या की, "आपण यशस्वी झालो आणि सुरक्षित लँडिंग केले. अंतराळयानात चंद्रावर शास्त्रज्ञांना आम्ही सलाम करतो."

चांदना चांद्रयान-3 वरील या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT