Teacher Recruitment Scam Partha Chatterjee Twitter
देश

ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्र्याला EDकडून अटक; शिक्षक भरती घोटाळ्यात मोठी कारवाई

EDने ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

Teacher Recruitment Scam: ईडीने ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी (Partha Chatterjee) यांना अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी छापे टाकून चौकशी केल्यानंतर चॅटर्जी यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची रोकड आणि सोने जप्त केले आहे. शुक्रवार 22 जुलै रोजी ईडीने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या मंत्र्यांवर छापे टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतरही हा छापा सुरूच आहे. पार्थ चॅटर्जीचा जवळचा सहकारी अर्पिताच्या घरातून ईडीने 20 कोटींहून अधिक रक्कम जप्त केली होती. ईडीने अर्पितालाही ताब्यात घेतले आहे.

गेल्या अनेक तासांपासून ममता बॅनर्जी यांचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची चौकशी सुरू होती, यादरम्यान ईडीने त्यांना अनेक प्रश्न विचारले, ज्यांचे मंत्री उत्तर देऊ शकले नाहीत. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

काय आहे शिक्षक भरती घोटाळा?

पश्चिम बंगाल सरकारच्या मंत्र्यांवर करण्यात येत असलेली ही संपूर्ण कारवाई शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित आहे. 2016 मध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झाली. ज्यामध्ये बनावट पद्धतीने प्रवेश मिळवण्यासाठी ओएमआर शीटमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये नापास उमेदवार लाखो रुपयांची लाच देऊन उत्तीर्ण झाले. या प्रकरणात थेट शिक्षणमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. यामध्ये अनेक लोक सामील असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यांना लवकरच अटक केली जाऊ शकते.

ममता यांचे आणखी एक मंत्री परेश अधिकारी यांच्या घरावर ईडी छापे टाकत आहे. यासोबतच त्याच्या जवळच्या मित्रांचीही चौकशी केली जात आहे. याशिवाय नोकरभरती घोटाळ्याशी संबंधित अन्य अधिकाऱ्यांवरही कारवाई सुरू आहे. पार्थ चॅटर्जीच्या अटकेनंतर आता ईडी चौकशीसाठी त्याची कोठडी मागू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT