Bengal Govt: पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल स्कूल सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राइमरी एजुकेशन बोर्ड भरती घोटाळ्याच्या संदर्भात ईडीने ही छापेमारी केली आहे. यादरम्यान बंगाल सरकारचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या विविध ठिकाणांवरही छापे टाकण्यात येत आहेत. पार्थ चॅटर्जी यांचे निकटवर्तीय सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून 20 कोटींची रोकड जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
बँक कर्मचारी पैसे मोजतायेत
अर्पिता मुखर्जी यांच्या निवासी कंपाऊंडमधून ईडीला (ED) ही रक्कम मिळाली आहे. ही रक्कम मोजण्यासाठी छापा टाकणारे पथक बँक कर्मचारी आणि मोजणी यंत्रांची मदत घेत आहेत. याशिवाय अर्पिता यांच्या घरातून 20 मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. इतके मोबाईल का वापरले गेले याचा शोध घेण्याचा अधिकारी प्रयत्न करत आहेत. खोलीत मोठ्या प्रमाणात 500 आणि 2000 च्या नोटा ठेवल्याचे फोटोत दिसत आहे.
शिक्षण राज्यमंत्री परेश यांच्या घरावर छापा
याशिवाय या प्रकरणी कूचबिहार जिल्ह्यातील शिक्षण राज्यमंत्री परेश अधिकारी यांच्या घराचीही ईडीचे कर्मचारी झडती घेत आहेत. एसएससी भरती घोटाळ्याप्रकरणी पार्थ चॅटर्जी आणि परेश अधिकारी यांची सीबीआयने (CBI) चौकशी केली आहे. ईडीने आमदार माणिक भट्टाचार्य आणि इतरांच्या घरावरही छापे टाकले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.