BSF ची मोठी कारवाई, बांगलादेश बॉर्डरवर पकडली सोन्याच्या तस्करीची मोठी खेप

Gold Smuggling: बीएसएफने बांगलादेशातून तस्करीच्या माध्यमातून आणलेली 341 सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत.
Gold Smuggling
Gold SmugglingDainik Gomantak
Published on
Updated on

Gold Smuggling Latest News: बांगलादेश सीमेवर बीएसएफने अलीकडच्या काळातील सोन्याच्या तस्करीची सर्वात मोठी खेप पकडली आहे. बीएसएफने बांगलादेशातून तस्करीच्या माध्यमातून आणलेली 341 सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. या बिस्किटांची बाजारातील किंमत 21 कोटींच्या आसपास आहे.

दरम्यान, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) च्या म्हणण्यानुसार, 21 जुलैच्या संध्याकाळी मिळालेल्या माहितीच्या आधारे, दक्षिण बंगाल फ्रंटियरच्या जवानांनी 24 परगणा जिल्ह्यातील बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या इछामती नदीमार्गे होणारी तस्करी रोखली. यादरम्यान एका बोटीवर 6-7 संशयित लोक बांगलादेश सीमेवरुन येताना दिसले होते.

Gold Smuggling
BSF कडून पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार, टिफिन बॉक्समधील तीन आयईडी केले जप्त

तस्कर बोटीतून उडी मारुन फरार झाले

बीएसएफच्या जवानांनी 321 सोन्याची बिस्किटे, चार सोन्याचे बार आणि एक सोन्याचे नाणे जप्त केले. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या सोन्याचे एकूण वजन 41.49 किलो आहे. त्याची बाजारातील किंमत 21.22 कोटी रुपये आहे. जप्त केलेले सोने 24 कॅरेटचे आहे. याशिवाय तस्करांच्या बोटीतून चार मोबाईल फोन, पॅकिंग साहित्य आणि बांगलादेशी वर्तमानपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

Gold Smuggling
BSF ला जम्मू आणि काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर सापडला संशयित बोगदा

तस्करांचा शोध सुरु

बीएसएफच्या म्हणण्यानुसार, फरार तस्करांच्या शोधात सीमा भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरु आहे. बांगलादेश सीमेवर बीएसएफने गेल्या काही वर्षांत पकडलेली सोन्याची ही सर्वात मोठी खेप आहे. 21 जुलै रोजीच, ढाकामध्ये (Dhaka) BSF आणि बांगलादेश बॉर्डर गार्ड्स (BGB) च्या महासंचालकांची पाच दिवसीय (17-21 जुलै) परिषद संपन्न झाली होती. वर्षातून दोनदा होणाऱ्या या परिषदेत दोन्ही देशांच्या बॉर्डर गार्ड एजन्सीने सीमेवरील गुन्हेगारी संपविण्याबाबत सखोल चर्चा केली होती. भारताकडून (India) बीएसएफचे डीजी पंकज सिंग आणि बांगलादेशच्या (Bangladesh) बाजूने बीजीबीचे महासंचालक मेजर जनरल शकील अहमद यांनी आपापल्या देशांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com