Rampurhat Former MLA Asish Banerjee Death Dainik Gomantak
देश

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

Rampurhat Former MLA Asish Banerjee Death: पश्चिम बंगालच्या राजकारणातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाटचे माजी आमदार आणि विधानसभेचे माजी उपसभापती आशीष बॅनर्जी यांचा मृत्यू झाला.

Sameer Amunekar

पश्चिम बंगालच्या राजकारणातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाटचे माजी आमदार आणि विधानसभेचे माजी उपसभापती आशीष बॅनर्जी यांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी त्यांच्या घराजवळ असलेल्या पक्षाच्या कार्यालयात त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाच वेळा रामपूरहाटचे आमदार

आशीष बॅनर्जी यांनी रामपूरहाट विधानसभा मतदारसंघाचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले होते. २००१ ते २०२६ या कालावधीत ते सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली होती. त्याचबरोबर पश्चिम बंगाल विधानसभेच्या उपसभापतीपदावरही त्यांनी काम केले होते.

राजकारणात येण्यापूर्वी त्यांची ओळख शिक्षक म्हणून होती. त्यामुळे मतदारसंघात त्यांचा दीर्घ राजकीय प्रवास आणि सामाजिक संपर्क असल्याचे सांगितले जाते.

निवडणुकीतील पराभवानंतर चर्चेला उधाण

अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत आशीष बॅनर्जी यांना भाजपचे उमेदवार ध्रुव साहा यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. अनेक वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर झालेला हा पराभव त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला.

दरम्यान, त्यांच्या मृत्यूची घटना अशा काळात समोर आली आहे, जेव्हा पश्चिम बंगालमध्ये राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे या घटनेची राजकीय पार्श्वभूमीही तपासली जात आहे.

घटनास्थळी कथित सुसाइड नोट सापडली

पोलिसांना घटनास्थळावरून एक कथित सुसाइड नोट मिळाल्याचे वृत्त आहे. या नोटमध्ये आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. तसेच राजकारणात प्रवेश करणे ही आपल्या आयुष्यातील मोठी चूक असल्याची खंत त्यांनी व्यक्त केल्याचेही वृत्त आहे.

आपल्या व्यावसायिक आणि सार्वजनिक आयुष्याचा उल्लेख करताना त्यांनी गैरप्रकारांपासून दूर राहिल्याचा दावा केल्याचे सांगितले जाते. शिक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवल्याचाही उल्लेख नोटमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबतही उल्लेख

तारापीठ-रामपूरहाट विकास प्राधिकरणाशी संबंधित काही बाबींमध्ये आपल्याला बाजूला करण्यात आल्याचा आणि आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख कथित नोटमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. आपण भ्रष्टाचारात सहभागी नव्हतो, असेही त्यांनी नमूद केल्याचे वृत्त आहे.

या सर्व बाबींची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास केला जाणार आहे. सापडलेल्या कथित सुसाइड नोटची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

राजकीय वर्तुळात शोककळा

आशीष बॅनर्जी यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर तृणमूल काँग्रेससह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला. दीर्घकाळ विधानसभेत आणि राज्य सरकारमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या नेत्याच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून मृत्यूची नेमकी परिस्थिती, कथित सुसाइड नोटची सत्यता आणि त्यातील उल्लेखांची पार्श्वभूमी याबाबत तपासानंतरच अधिक स्पष्ट माहिती समोर येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT