Weather Update | Goa Weather Update Dainik Gomantak
देश

Weather Update : येत्या दोन दिवसांत तापमानाचा पारा घसरणार! गोव्यात अशी असणार हवामानाची स्थिती

गोव्यात काही दिवसांपासून तापमान घसरले असून थंडीमध्ये वाढ झाली आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर भारतात सध्या थंडीच्या लाटेपासून दिलासा मिळाला आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारी सकाळी 5.30 वाजता 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पण हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या दोन दिवसांत पुन्हा तापमानात घट नोंदवली जाऊ शकते. विभागानुसार 14 ते 16 जानेवारी दरम्यान पारा 5 अंशांपर्यंत खाली येऊ शकतो.

वेस्टर्न डिस्टर्बन्सचा जोर कायम आहे, त्यामुळे हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता असल्याचे हवामान खात्याच्या अंदाजात सांगण्यात आले आहे. 13 जानेवारीला जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बर्फवृष्टी होऊ शकते. (Weather Update)

  • गोव्यात अशी असणार तापमानाची स्थिती

गोव्यात काही दिवसांपासून तापमान घसरले असून थंडीमध्ये वाढ झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात 27 अंश सेल्सिअस ते 18 अंश सेल्सिअस इतके तापमान घसरण्याची शक्यता आहे. त्याबरोबर पुढील काही दिवस राज्यात धुक्यातही वाढ होणार आहे.

  • हलक्या पावसाची शक्यता

पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या लगतच्या भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आठवडाभरात देशभरात लक्षणीय पावसाची शक्यता नाही. गुरुवारीच दिल्लीतील अनेक भागात हलका पाऊस झाला.

तापमानाबद्दल बोलायचे झाले तर राजधानी दिल्लीचे तापमान शुक्रवारी सकाळी 12.2 अंश सेल्सिअस होते, जे पालममध्ये नोंदवले गेले. चंदीगडमध्ये 11 अंश सेल्सिअस, लखनऊमध्ये 11.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली.

विभागानुसार, पुढील 48 तासांत वायव्य भारत आणि लगतच्या मध्य भारताच्या काही भागात 3 ते 5 अंश सेल्सिअसची घसरण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पूर्वेकडील अनेक भागांत किमान तापमानात विशेष बदल झालेला नाही.

गुजरातमध्ये 15 तारखेपर्यंत तापमानात 3 ते 6 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून त्यानंतर कोणताही विशेष बदल होणार नाही. पुढील 4-5 दिवसांत उर्वरित भागात किमान तापमानात कोणताही विशेष बदल होणार नाही.

  • थंडी वाढण्याची भीती

15 ते 18 तारखेला उत्तर राजस्थानच्या काही भागात थंडीची लाट राहील, तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या विविध भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. 13 आणि 14 जानेवारीला अंतर्गत कर्नाटकात, तर 16 आणि 17 जानेवारीला मध्य प्रदेशात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Crime: 'ॲपल सपोर्ट'च्या नावाखाली अमेरिकनांची लूट; बांबोळीतील आलिशान व्हिलावर सायबर पोलिसांचा छापा' 10 जण अटकेत

US Iran Secret Talks: अमेरिका आणि इराण यांच्यात 3 तास सिक्रेट मीटिंग, डोनाल्ड ट्रम्प यांचा तेहरानला थेट आणि खणखणीत इशारा; म्हणाले, 'एक मार्ग विनाशाचा तर...'

Goa Politcs: काँग्रेसने 'गोवा रक्षण यात्रा' नव्हे, 'आमदार राखण यात्रा' काढावी; 'आप'चा खोचक सल्ला, पक्षांतरांवरून निशाणा

Goa Politics: 'गोवा रक्षण यात्रेने फरक पडणार नाही'; 2027नंतरही भाजपचेच सरकार येणार, विश्वजीत राणेंचा दावा

Small Savings Schemes: गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी! PPF, सुकन्या आणि किसान विकास पत्रच्या व्याजदरांवर 30 सप्टेंबरला मोठा निर्णय; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT