Sharad Yadav Died: ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचे निधन

वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; मुलीने ट्विट करून दिली माहिती
Sharad Yadav
Sharad Yadav Dainik Gomantak
Published on
Updated on

Sharad Yadav Died: ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. त्यांची मुलगी सुभाषिनी यादव यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की शरद यादव यांना बेशुद्धावस्थेत आणि प्रतिसादहीन अवस्थेत फोर्टिस आपत्कालीन स्थितीत आणण्यात आले होते. तपासणीत त्यांच्या हृदयाची स्पंदने किंवा रेकॉर्ड करण्यायोग्य रक्तदाब नसल्याचे दिसून आले. रात्री 10.19 वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले.

Sharad Yadav
Security Lapse In PM Modi Road Show: PM मोदींच्या रोड शो दरम्यान सुरक्षेत कुचराई, SPG ने...

शरद यादव यांच्या कन्या सुभाषिनी यादव यांनी 'पापा नहीं रहे.' असे ट्विट केले आहे. शरद यादव चार वेळा बिहारच्या मधेपुरा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. जनता दल युनायटेडच्या (जेडीयू - संयुक्त जनता दल) या पक्षाचे ते अध्यक्ष होते. तसेच काही काळ त्यांनी केंद्रीय मंत्रीपदही भुषविले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पंतप्रधान मोदींनीकडून शोक

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून यादव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मोदींनी म्हटले आहे की, "श्री शरद यादव जी यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या दीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांनी स्वतःची एक संसदपटू आणि मंत्री म्हणून ओळख बनवली. ते डॉ. लोहिया यांच्या आदर्शांमुळे प्रभावित झालेले नेते होते. मी आमच्यातील संवादाची नेहमची आठवण ठेवेन. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांप्रती संवेदना, शांती."

Sharad Yadav
Mahadayi Water Dispute: म्हादईबाबत गोव्याला आश्वासन, मग कर्नाटकचे काय? पंतप्रधानांनी उत्तर देण्याची मागणी...

70 च्या दशकात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील चळवळीतून शरद यादव यांनी भारतीय राजकारणात पाऊल ठेवले. त्यांनी जनता दलापासून फारकत घेत जनता दल (युनायटेड) ची स्थापना केली. स्थापनेपासून ते या पक्षाचे अध्यक्ष होते. अलीकडच्या काळात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील गटाला निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर शरद यादव यांनी जेडीयूवरील आपला दावा गमावला. पुढे नितीश कुमार यांनी शरद यादव यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला. त्यामुळे त्यांना राज्यसभेतून अपात्र ठरवण्यात आले. त्यांनी स्वतःचा लोकतांत्रिक जनता दल हा पक्ष काढला. कालांतराने हा पक्ष त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलता विलीन केला. त्यांची मुलगी सुभाषिनी यादव या काँग्रेसमध्ये आहेत.

शरद यादव यांनी 1999 ते 2004 दरम्यान अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये विविध खाती सांभाळली. ते 7 वेळा लोकसभेत निवडून आले होते तर 3 वेळा ते राज्यसभेत खासदार होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com