Voter List Dainik Gomantak
देश

Voter List: 18 वर्षे पूर्ण होताच मतदार यादीत आपोआप येणार नाव

सरकार संसदेत एक विधेयक आणणार आहे, ज्यामध्ये मतदार यादीशी जन्म आणि मृत्यू रजिस्टर जोडण्याची तरतूद असेल.

गोमन्तक डिजिटल टीम

VoterList : गृहमंत्री अमित शहा यांनी जनगणनेबाबत मोठी घोषणा केली आहे. जनगणनेबाबत अमित शाह म्हणाले की, सरकार संसदेत एक विधेयक आणणार आहे, ज्यामध्ये मतदार यादीशी जन्म आणि मृत्यू रजिस्टर जोडण्याची तरतूद असेल. महानिबंधक आणि जनगणना आयुक्त कार्यालयाच्या जनगणना भवनाचे उद्घाटन करताना अमित शहा यांनी ही घोषणा केली.

अमित शाह म्हणाले की, जन्म आणि मृत्यूशी संबंधित डेटा मतदार यादी आणि सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेशी जोडण्यासाठी संसदेत विधेयक आणण्याची योजना आहे. ते म्हणाले की, जनगणना हा विकासाच्या अजेंड्याचा आधार बनू शकतो.

डिजिटल जनगणना डेटा खूप फायदेशीर सिद्ध होईल. शहा म्हणाले की, जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित योजना बनवून विकास सर्वात गरीबांपर्यंत पोहोचेल याची खात्री करता येईल.

जन्म-मृत्यू दाखल्यांचा डेटा विशेष पद्धतीने जतन केल्यास सर्वांगीण विकासाचे नियोजन करणे सोपे जाईल, असेही ते म्हणाले. गृहमंत्री शाह म्हणाले की, जन्म आणि मृत्यू नोंदणी जनगणनेशी जोडण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. याबाबत सरकार संसदेत विधेयक आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गृहमंत्री शाह यांनीही स्पष्टपणे सांगितले की, या पावलाचा मोठा फायदा म्हणजे एखाद्या व्यक्तीचे वय १८ वर्षे पूर्ण होताच त्याचे नाव मतदार यादीत आपोआप समाविष्ट होईल. ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, मृत्यू प्रमाणपत्र जारी होताच त्याचा डेटा आपोआप निवडणूक आयोगाकडे जाईल. यानंतर आयोग त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करेल, असे शहा यांनी सांगितले.

दुरुस्ती विधेयकाचे फायदे

अमित शहांच्या घोषणेनंतर सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यात १९६९ मध्ये सुधारणा केल्यास त्याचे काय परिणाम होतील, अशी चर्चाही सुरू झाली आहे.

यामुळे अनेक कामे सुलभ होतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट जारी करण्यापासून इतर सरकारी योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत अनेक गोष्टी अतिशय सोयीस्कर होतील.

अधिकार्‍यांचे असेही म्हणणे आहे की, जन्म-मृत्यूशी संबंधित डेटा विशेष पद्धतीने ठेवल्यास जनगणनेदरम्यानच्या कालावधीतील आकडेवारीचा अंदाज घेऊन विकास योजना तयार आणि प्रभावीपणे लागू करता येतील. यापूर्वी डेटाच्या कमतरतेमुळे हे शक्य नव्हते. गृहमंत्री शाह यांनी जनगणना भवनासह जन्म आणि मृत्यू नोंदणीसाठी एक वेब पोर्टल देखील सुरू केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT