Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: बाकी सगळं सोडा, ही गाडी तिथं पोहोचली कशी? व्हायरल व्हिडिओनं वाढवलं नेटकऱ्यांचं टेन्शन; अतरंगी कारनामा पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

Viral Auto Rickshaw Parking Video: असाच एक डोळे चक्रावून टाकणारा आणि थक्क करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला, जो पाहून तुम्हीही नक्कीच डोक्याला हात लावाल.

Manish Jadhav

Viral Auto Rickshaw Parking Video: सध्याच्या डिजिटल युगात लोकांना रस्त्यावर काहीही अतरंगी किंवा अजब पाहायला मिळालं की ते लगेच त्याचा व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेली ही अनोखी दृश्यं मग काही वेळातच इंटरनेटवर तुफान व्हायरल होतात. असाच एक डोळे चक्रावून टाकणारा आणि थक्क करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला, जो पाहून तुम्हीही नक्कीच डोक्याला हात लावाल. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक अजब आणि चमत्कारी दृश्य पाहायला मिळत असून, ते पाहून लोकांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एखाद्या मोठ्या वादळानंतरचा असल्यासारखा वाटत आहे. व्हिडिओमध्ये दिसतेय की, परिसरात खूप तीव्र वादळ आले होते, ज्यामुळे रस्त्यावर झाडांच्या फांद्या आणि एका बाजूला एक भलेमोठे झाड उन्मळून पडलेले दिसत आहे. परंतु, हा व्हिडिओ वादळामुळे किंवा उन्मळून पडलेल्या झाडांमुळे (Trees) व्हायरल झालेला नाही, तर त्या ठिकाणी एका मातीच्या ढिगाऱ्यावर उभ्या असलेल्या रिक्षामुळे प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक रिक्षा मातीच्या उंच ढिगाऱ्यावर अगदी व्यवस्थित पार्क केलेली दिसत आहे.

आता लोकांना सर्वात मोठा प्रश्न हा पडला की, हे वाहन इतक्या उंचावर आणि अशा कठीण जागी पोहोचले तरी कसे? हा त्या रिक्षा ड्रायव्हरचा एखादा अद्भूत करिश्मा आहे की यामागे दुसरे काही कारण आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, या गूढ आणि अतरंगी दृश्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर कौतुकाचा आणि आकर्षणाचा विषय बनला.

हा थक्क करणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 'sanjeevkumar.patel.5095' नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला. हे वृत्त लिहेपर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून, त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. कमेंट सेक्शनमध्ये नेटकरी आपापल्या परीने मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने आश्चर्याने विचारले की, "ही रिक्षा इतक्या वर कशी काय पोहोचली?"

तर दुसऱ्या युझरने लिहिले, "बाकी सगळं ठीक आहे, पण ही रिक्षा भिंतीसारख्या उभ्या ढिगाऱ्यावर चढली कशी, एवढंच सांगा." एका तिसऱ्या युझरने तर बाकी सगळे विषय सोडून आधी हे वर कसे चढले याचं गुपित सांगण्याची मागणी केली. दुसरीकडे, एका युझरने ड्रायव्हरची फिरकी घेत, "भावाने पार्किंग अगदी योग्य ठिकाणी केली," अशी मजेशीर कमेंट केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया युझर्सचे भरपूर मनोरंजन करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT