Viral Video: मृत्यूच्या दाढेत 4 तास! रोलर कोस्टर बंद पडल्यानं 100 फूट उंचीवर अडकली 8 शाळकरी मुलं; 22 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

Texas Roller Coaster Malfunction Viral Video: आजकालच्या धावपळीच्या युगात तरुणाईमध्ये 'अॅडव्हेंचर' म्हणजेच साहसी खेळांची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
Texas Roller Coaster Malfunction Viral Video
Texas Roller Coaster Malfunction Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

आजकालच्या धावपळीच्या युगात तरुणाईमध्ये 'अॅडव्हेंचर' म्हणजेच साहसी खेळांची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोणी रिव्हर राफ्टिंग करते, कोणी स्कायडायव्हिंगचा थरार अनुभवते, तर कोणी वेगात धावणाऱ्या रोलर कोस्टरवर बसून आनंद घेते. मात्र, कधीकधी हाच आनंद थेट मृत्यूच्या दारात घेऊन जाऊ शकतो, याचा प्रत्यय आणून देणारी एक अत्यंत भयानक घटना अमेरिकेतील टेक्सासमधून समोर आली आहे.

एका स्कूल ट्रिप दरम्यान रोलर कोस्टरमध्ये झालेल्या बिघाडामुळे ८ निष्पाप विद्यार्थी तब्बल ४ तास हवेत १०० फूट उंचीवर उलट्या अवस्थेत लटकून राहिले होते. या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

चढाई करतानाच थांबली राइड

ही धक्कादायक घटना २८ मे रोजी टेक्सासमधील गॅल्व्हेस्टन येथे असलेल्या प्रसिद्ध 'प्लेजर पिअर' मनोरंजन पार्कमध्ये घडली. शाळेच्या सहलीसाठी आलेले आठ विद्यार्थी मोठ्या उत्साहाने रोलर कोस्टरच्या राईडचा आनंद घेण्यासाठी त्यामध्ये बसले होते.

मात्र, अचानक रोलर कोस्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि तो जागेवरच ठप्प झाला. जमिनीपासून तब्बल १०० फूट उंचीवर गाडी थांबल्याने सर्व विद्यार्थी तिथेच अडकले.

Texas Roller Coaster Malfunction Viral Video
Goa Pink Taxi: पिंक रिक्षानंतर आता महिलांसाठी 'पिंक टॅक्‍सी'; सहकार खाते प्रयत्‍नशील, बँकांशी सकारात्मक चर्चा

४ तासांचे श्वास रोखून धरणारे रेस्क्यू ऑपरेशन

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाचे जवान विशेष बचावात्मक उपकरणांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. गॅल्व्हेस्टनचे फायर चीफ माईक वरेला जुनियर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना खाली उतरवण्यासाठी विभागाला टॉवर १ इंजिन आणि हाय-टेक शिड्यांचा वापर करावा लागला.

हवेत प्रचंड उंची आणि दुसरीकडे कडक ऊन यामुळे वातावरण अतिशय आव्हानात्मक होते. भीषण उकाड्यात तब्बल चार तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, सर्व विद्यार्थ्यांना जवानांनी अत्यंत सुरक्षितपणे शिडीच्या साहाय्याने खाली उतरवले. खाली आल्यावर हे सर्व मुले प्रचंड घाबरलेली होती आणि रडत होती.

नेटकऱ्यांचा संताप

या थरारक रेस्क्यू ऑपरेशनचा २२ सेकंदांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (ट्विटर) वर @accuweather नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १ लाख ३४ हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. हा भयानक देखावा पाहून नेटकऱ्यांनी संबंधित पार्कच्या व्यवस्थापनावर जोरदार टीका केली आहे.

Texas Roller Coaster Malfunction Viral Video
Goa Road Accident: 'थार'की मृत्युचा सापळा? आठवड्यात तिघांचा बळी, पाच महिन्यांत 101 रस्ते अपघाती मृत्यू

एका यूजरने लिहिले की, "मुलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या कंपनीवर निष्काळजीपणा आणि खराब व्यवस्थापनासाठी कडक कायदेशीर खटला चालवला पाहिजे." तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने उपरोधिक टोला लगावत लिहिले, "या भयंकर अनुभवानंतर हे मुले आयुष्यात पुन्हा कधीच रोलर कोस्टरच्या जवळही जाणार नाहीत." या दुर्घटनेने साहसी खेळांच्या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षेच्या नियमांवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com