Viral Video Schoolboy Threat Dainik Gomantak
देश

Viral Video: "शाळाच तोडून टाकीन!" छोट्या डॉनची थेट मास्तरांना धमकी, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरीही हक्काबक्का; म्हणाले, 'बच्चा खतरनाक है भाई'

Viral Video Schoolboy Threat: व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओची सुरुवात एका लहान मुलाच्या आक्रमक आवाजाने होते. तो मुलगा आपल्या शिक्षकाला थेट शाळा तोडून टाकण्याची धमकी देताना दिसत आहे.

Manish Jadhav

Viral Video Schoolboy Threat: आजच्या काळात सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या स्वरुपात या आभासी जगाशी जोडला गेला आहे. काही लोक येथे स्वतःचा कंटेंट तयार करुन प्रसिद्धी मिळवतात, तर काही जण केवळ मनोरंजन म्हणून तासनतास व्हिडिओ पाहण्यात घालवतात. अशाच मनोरंजनाच्या ओघात सध्या एका शाळकरी मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यातील मुलाची 'धमकी' ऐकून नेटकरी थक्क झाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओची सुरुवात एका लहान मुलाच्या आक्रमक आवाजाने होते. तो मुलगा आपल्या शिक्षकाला थेट शाळा तोडून टाकण्याची धमकी देताना दिसत आहे. हा मुलगा भोजपुरी भाषेत बोलत असून तो अत्यंत आत्मविश्वासाने म्हणतो, "मी ही शाळाच तोडून टाकीन!" मुलाचा हा रुद्रावतार पाहून शिक्षक मात्र शांतपणे आणि प्रेमाने त्याला विचारतात, "काय, तू माझी शाळा तोडणार का?" त्यावर तो मुलगा आपल्या भूमिकेवर ठाम राहून पुन्हा पुन्हा "तोडून टाकीन, तोडून टाकीन" असे म्हणत राहतो. शिक्षक त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात की, "अरे बाबा, शाळा नको तोडू."

त्यानंतर शिक्षक (Teacher) दुसऱ्या एका विद्यार्थ्याला या मुलाला पकडून आणायला सांगतात. तो मुलगा जवळ आल्यावर शिक्षक त्याला मायेने विचारतात की, "हे बघ, मी तुला फक्त अभ्यास करायला सांगतो, तर तुला इतका राग का येतो?" शिक्षकांनी इतके प्रेमाने विचारुनही तो मुलगा दबलेल्या आवाजात पुन्हा एकदा शाळा तोडण्याबद्दलच पुटपुटतो. त्याच्या या निरागस पण रागीट स्वभावाचा व्हिडिओ सध्या नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे.

हा व्हिडिओ 'X' वर @micchamasala नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये विचारले की, "तुम्हीही लहानपणी शाळेत अशी काही धमकी दिली होती का?" हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून त्यावर मजेशीर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका युजरने लिहिले आहे की, "हा मुलगा खूपच खतरनाक आहे भाई!", तर दुसऱ्याने गंमतीने म्हटले की, "हा खरंच शाळा तोडेल, याची रंगबाजी पाहण्यासारखी आहे." या चिमुरड्याच्या 'धमकी'ने सोशल मीडियावर सध्या हास्याचे कारंजे उडवले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Services: सरकारची मोठी डिजिटल सुविधा; आता व्हॉट्स-ॲपवरून मिळणार सरकारी सेवा, AI चॅटबॉटचा शुभारंभ

Goa Casino Case: प्रतिज्ञापत्र वेळेत दाखल करा, अन्यथा दंड! 'कॅसिनो' प्रकरणात गोवा खंडपीठाचा प्रतिवादींना स्पष्ट इशारा

Super El Nino: 450000 लोकांच्या जीवाला धोका! 'सुपर एल नीनो' ठरतोय खतरनाक, भारतसह 11 देशांमध्ये वाढला धोका; 2027 जगासाठी ठरणार विध्वंसक? VIDEO

Porvorim Traffic Congestion: पर्वरीतील 300 मीटरचा पट्टा ठरू शकतो वाहतुकीचा 'हॉटस्पॉट'; उन्नत मार्ग-अटल सेतू जोडणीसाठी नेमका काय उपाय?

IND vs WI: कॅरेबियन गोलंदाजांवर तुटून पडणार 'हिटमॅन' आणि 'किंग कोहली'! विंडीजविरुद्धच्या मालिकेत 5 महाविक्रम मोडण्यासाठी 'रो-को' सज्ज; सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड धोक्यात

SCROLL FOR NEXT