Viral Video: 'दुचाकी की चालतं-फिरतं मृत्यूचं जाळं', चिमुकल्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या बापाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी सुनावले खडे बोल

Dangerous Bike Jugaad Viral Video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ पोस्ट केले जातात, यातील काही मजेशीर तर काही काळजाचा ठोका चुकवणारे असतात.
Dangerous Bike Jugaad Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Dangerous Bike Jugaad Viral Video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ पोस्ट केले जातात, यातील काही मजेशीर तर काही काळजाचा ठोका चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून तो एका 'जुगाडा'शी संबंधित आहे. मात्र, हा जुगाड पाहून कौतुक करण्याऐवजी लोक भीती व्यक्त करत आहेत, कारण यात एका चालकाने स्वतःच्या आणि निष्पाप मुलांच्या जिवाशी खेळ मांडल्याचे दिसून येते.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रस्त्यावरुन अनेक वाहने ये-जा करताना दिसत आहेत. याच दरम्यान एका व्यक्तीची दुचाकी सर्वांचे लक्ष वेधून घेते. या व्यक्तीने आपल्या दुचाकीवर केवळ तीन लोकांनाच बसवले नाही, तर मागे मुलांसाठी एक विशेष 'धोकादायक जुगाड' केला. त्याने दुचाकीच्या पाठीमागे एक छोटी ट्रॉली जोडली असून त्या ट्रॉलीमध्ये अनेक लहान मुले बसलेली दिसत आहेत. रस्ते अपघातांच्या वाढत्या घटना पाहता जर दुचाकीचा समतोल चुकला किंवा दुसऱ्या वाहनचालकाच्या चुकीमुळे जरी या दुचाकीचा बॅलन्स बिघडला, तर ट्रॉलीत बसलेल्या मुलांच्या जिवाचे काय होईल, असा गंभीर प्रश्न हा व्हिडिओ पाहून उपस्थित होत आहे.

Dangerous Bike Jugaad Viral Video
Viral Video: "एका सेल्फीसाठी 100 रुपये लागतील!", वैभव सूर्यवंशीने मुलांकडे मागितले पैसे; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ 'X' वर @rose_k01 नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओ पाहून एका वापरकर्त्याने आश्चर्याने विचारले की, "मी नक्की कुठे आहे?", तर दुसऱ्या एकाने दुचाकीची बनावट पाहून हा व्हिडिओ पाकिस्तानमधील (Pakistan) असावा असा अंदाज वर्तवला.

Dangerous Bike Jugaad Viral Video
Viral Video: दगड उगारला अन् माकड चवताळलं! आजीला 'ती' चूक पडली महागात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी घेतली मजा

काहींनी यावर हसण्याचे इमोजी पोस्ट केले असले, तरी बहुतांश लोक या असुरक्षित प्रवासावर टीका करत आहेत. प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा सोयीसाठी केले जाणारे असे स्टंट आणि जुगाड मृत्यूला आमंत्रण देणारे ठरु शकतात, असे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com