Kanpur Violence Dainik Gomantak
देश

Kanpur Violence: भाजप नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हिंसाचार, वाचा संपूर्ण प्रकरण

कानपूरमध्ये (Kanpur) शुक्रवारी हिंसाचार उसळला.

दैनिक गोमन्तक

कानपूरमध्ये शुक्रवारी हिंसाचार उसळला. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल केलेल्या कथित वक्तव्यावरुन हिंसाचार उसळला आहे. शहरातील अनेक मुस्लिमबहुल भागात जोरदार दगडफेक झाली. पेट्रोल बॉम्बही फोडण्यात आले. चोरट्यांनी कुठे तोडफोड तर कुठे लूटमार केली. बराच गदारोळ झाला आहे. (Violence erupts in Kanpur over BJP leader Nupur Sharma's alleged remarks about Prophet Muhammad)

दरम्यान, रस्त्यावर नमाज अदा केल्यानंतर एका विशेष धर्मातील लोक रस्त्यावर आले. त्यांनी जोरदार दगडफेक सुरु केली. परिस्थिती काही वेळातच बिघडली. बिघडलेली परिस्थिती पाहून मोठा पोलीस (Police) फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी घेराव घालून लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र दगडफेक सुरुच राहीली. त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले. दुसरीकडे, पोलिसांनी तातडीने सर्व जखमींना रुग्णालयात (Hospital) पाठवले असून सर्वांची प्रकृती सामान्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच, हिंसाचाराची माहिती मिळताच डीएम आणि सहपोलीस आयुक्तांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या (BJP) राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद साहिब यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन हा हिंसाचार उसळला. शुक्रवारच्या नमाजानंतर लोकांची गर्दी नवीन रस्त्यावर जमू लागली. भाजप प्रवक्त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, मात्र काही अराजक तत्वांनी दगडफेक सुरु केल्यानंतर वातावरण बिघडले आणि दुसऱ्या बाजूनेही दगडफेक सुरु झाली. परिस्थिती इतकी अनियंत्रित झाली की, दगडफेकीसोबतच हल्लेखोरांनी गोळीबार आणि बॉम्बफेकही केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rekha Gupta Attack: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या 35 वर्षीय व्यक्तीने मारली कानाखाली? हल्लेखोराचा चेहरा समोर, आतिषीनी केला निषेध

Bicholim: चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, गोव्यातील 'या' मार्गावर वाहनांना बंदी; जाणून घ्या पर्यायी व्यवस्था

Porvorim Roads: 'त्या' रस्त्याची चांगली 'पर्वरी'श झाली नाही; निवासी आणि प्रवासी संतप्त

Horoscope: प्रमोशन मिळणार, व्यापार वाढणार; कसा असणार 21 ऑगस्टचा दिवस; वाचा..

Goa Police: 3 वेगवेगळे आरोप, 2007 साली बडतर्फ; खंडपीठाच्या आदेशानंतर निलंबित हवालदार 18 वर्षांनंतर सेवेत

SCROLL FOR NEXT