Rajasthan Violence: भाजप आमदाराच्या घराबाहेर जाळपोळ, 10 पोलीस स्टेशन परिसरात संचारबंदी

जोधपूरमध्ये काय घडलं?
Jodhpur Violence
Jodhpur ViolenceDainik Gomantak
Published on
Updated on

राजस्थानच्या जोधपूरमध्ये रात्री उशिरा लाऊडस्पीकरवरून सुरू झालेला गोंधळ थांबत नाहीये. आज सकाळी नमाजनंतर हाणामारी झाली. हिंसाचाराची आग आमदारांच्या घरापर्यंतही पोहोचली आहे. भाजप आमदार सूर्यकांत व्यास यांच्या घराबाहेर बाईक पेटवली. सध्या पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले आहे. जोधपूरमधील 10 पोलीस ठाण्याच्या हद्दीत आता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. हा कर्फ्यू 4 मेच्या रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.

पहाटे पुन्हा दगडफेकीचे वृत्त समोर आले होते. त्याला सामोरे जाण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या. सोमवारी रात्री म्हणजेच ईदच्या पूर्वसंध्येला हा गोंधळ सुरू झाला. हिंसाचाराच्या घटनेनंतर राजस्थान सरकारने कारवाई केली आहे. सीएम गेहलोत यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. यामध्ये डीजीपी आणि इतर अधिकारी सहभागी झाले होते.

Jodhpur Violence
जम्मू-काश्मीरमध्ये नमाजानंतर मशिदीबाहेर सुरक्षा दलांवर दगडफेक

खासदार राज्यवर्धन सिंह राठोड यांनी राजस्थान सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, गेहलोत सरकार एका समुदायाला खूश करण्याचा प्रयत्न करत आहे. राजस्थान तालिबान बनले आहे आणि सरकार औरंगजेबी निर्णय घेते. गेहलोत गृहमंत्री आहेत, त्यांना याची जबाबदारी घ्यावी लागेल, असे ते म्हणाले.

जोधपूरमध्ये काय घडलं?

मुस्लिमबहुल परिसर असलेल्या जालोरी गेट परिसरात ईदच्या आदल्या रात्री ईदचा झेंडा लावण्यात आला. हे तिथे वर्षानुवर्षे होत आहे. यासोबतच तेथे लाऊडस्पीकरही लावण्यात आला होता. त्यानंतर काही हिंदू संघटनेशी संबंधित लोक तेथे पोहोचले आणि ध्वज ओढून खाली उतरवला. हिंदू संघटनांचे म्हणणे आहे की त्यांनी परशुराम जयंतीच्या दिवशी तेथे भगवा ध्वज लावला होता. ध्वज उतरवल्याचा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला, त्यानंतर मुस्लिम समाजाचे लोकही चौकाचौकात पोहोचले आणि त्यानंतर दगडफेक झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com