Madhya Pradesh Dainik Gomantak
देश

गुगल मॅपवर मंदिराला सांगितले मशीद ग्रामस्थांनी केला गोंधळ; पोलिसांनी उचलले पाऊल

एका तरुणाने गुगल मॅपशी छेडछाड करून मंदिराला मशीद म्हटल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

दैनिक गोमन्तक

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रतलाम जिल्ह्यामध्ये सामाजिक-धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नामली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भादवासा गावामध्ये एका तरुणाने गुगल मॅपशी छेडछाड करून मंदिराला मशीद म्हटल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. (The villagers called the temple a mosque on Google Maps The steps taken by the police)

याबाबत तक्रार करण्यासाठी काही ग्रामस्थांनी नामली पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटकेत घेतले आहे. या कारवाईनंतर गुगल मॅपवर मंदिराचे नाव पुन्हा दुरुस्त करण्यात आले आहे. पुढील कारवाई करत असल्याचे पोलिसांनी सांगितेले आहे.

आरोपी तरुणाने गुगल मॅपवर भदवासा गावातील अंबे माता मंदिर हे काहकाशन मशीद असे लिहिले होते. थोड्या वेळाने कोणीतरी या कृत्याचे स्क्रीन शॉट्स शेअर केले. गुगल मॅपमधील हा बदल ग्रामस्थांना पाहताच त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी नामली पोलीस ठाणे गाठून पोलिसामध्ये तक्रार नोंदविण्याची मागणी केली.

पोलिसांनी याप्रकरणी कडक कारवाई करावी यासाठी नागरिकांनी मागणी केली आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी या प्रकरणी लोकांकडे चौकशी सुरू केली तेव्हा कळले की, गुगल मॅपवर मशिदीचे नाव कोणीतरी संपादित करून त्याचे मंदिरात रूपांतर केले.

या प्रकरणाबाबत रतलामचे एएसपी सुनील पाटीदार म्हणाले की, आम्हाल तक्रार मिळाली आहे की, गुगल मॅपवर दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीने मंदिराचे नाव बदलले आहे. आम्ही या प्रकरणी कलम 295-ए अंतर्गत एफआयआर देखील नोंदवला आहे. आरोपीला आम्ही पकडले आहे आणि पुढील कार्यवाही सुरू आहे.

विशेष म्हणजे गुगल मॅपवर एखाद्या ठिकाणाचे नाव बदलण्याचा पर्याय असतो. त्याचा वापर करून लोक त्यांच्या व्यवसाय प्रतिष्ठानचे नाव, गावाचे नाव आणि ठिकाण लिहू शकतात. पण, या प्रकरणामध्ये रतलाममधील धार्मिक स्थळाचे नाव बदलण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: यशस्वी जयस्वालची 'तेरे नाम' हेअर स्टाईल, विराट कोहलीने उडवली खिल्ली; पाहा खेळाडूंची ऑन-कॅमेरा मस्ती

Goa Accident: अपघाताचे सत्र थांबेना! मुरगाव येथे भरधाव कारची दुचाकीला धडक, 55 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; कारचालकावर गुन्हा दाखल

Tamil Nadu Bus Crash: तामिळनाडूमध्ये दोन बसेसची समोरासमोर टक्कर, 11 जणांचा मृत्यू; 50 हून अधिक प्रवासी जखमी VIDEO

Serendipity Arts Festival: बहुविध कलांचा मोठा महोत्सव! 'सेरेन्डिपिटी'साठी सजतेय पणजी; जगभरातील कलाकार-प्रेक्षक येणार एकत्र

Konkani Film Festival: काणकोण येथे रंगणार 'कोकणी चित्रपट महोत्सव'! कुठे कराल बुकिंग, काय आहेत तारखा; जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT