PM मोदींनी दलाई लामांशी केली चर्चा, म्हणून ड्रॅगनला झोंबल्या मिर्च्या

तिबेट हा चीनचा अंतर्गत मामला आहे, दलाई लामांबाबत पंतप्रधान मोदींना चीनचा सल्ला
Dalai Lama
Dalai LamaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Dalai Lama: तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा गेल्या अनेक वर्षांपासून भारतात आहेत, तेथून ते जगभरात त्यांच्या धर्म आणि संस्कृतीचा प्रचार करत आहेत. मात्र चीनने त्यांच्या या कार्याला नेहमीच विरोध केला आहे. भारताने दलाई लामांना आश्रय दिल्यावर चीनने अनेकदा आक्षेप घेतला आहे. त्याचवेळी पीएम मोदींच्या एका ट्विटने ड्रॅगनला चांगलीच मिर्ची झोंबली आहे. खरे तर 6 जुलै रोजी दलाई लामा यांचा वाढदिवस होता, त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले तेव्हा चीनची चावचाव सुरू झाली. (PM Modi Greets Dalai Lama)

पंतप्रधान मोदींंना चीनचा लल्ला

दलाई लामांबाबत पंतप्रधान मोदींच्या भूमिकेबाबत चीनने सल्लाही दिला आहे. चीनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'तिबेट हा चीनचा अंतर्गत मामला आहे. यामध्ये बाहेरील कोणत्याही शक्तीने हस्तक्षेप करू नये. दलाई लामा यांचा चीनविरोधी फुटीरतावादी स्वभाव भारताने ओळखला पाहिजे.'

Dalai Lama
पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न, सुरक्षा यंत्रणांनी दिला अलर्ट

चीनच्या या आक्षेपाला भारताच्या बाजूनेही उत्तर देण्यात आले असले तरी भारतानेही प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये भारताने म्हटले आहे की, आमच्यासाठी दलाई लामा हे सन्माननीय पाहुणे आहेत, याकडे प्रत्येकाने या सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, दलाई लामा हे धार्मिक नेते असून त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत. त्यांना भारतात धार्मिक आणि अध्यात्मिक कामांसाठी सूट देण्यात आली आहे.

Dalai Lama
BJP ने हरियाणा आयटी सेलचे प्रभारी अरुण यादव पदावरून बडतर्फ

तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी दलाई लामा यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी स्वत: दलाई लामा यांच्याशी फोनवर संवाद साधत शुभेच्छा दिल्यात. मात्र दरवेळेप्रमाणेच यावेळीही चीनने पंतप्रधान मोदी आणि दलाई लामा यांच्यातील संवादावर आक्षेप घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Greater Noida Delivery Riders Fight
Ashutosh Ranka CJP press conference
Supreme Court Delhi barricades
Viral Video
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com