अंदाधुंद गोळीबार करून टीएमसी नेत्यासह 3 जण ठार; पोलिसांचा तपास सुरु

TMC नेते स्वपन माझी यांची आज सकाळी पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
Crime
Crime Dainik Gomantak
Published on
Updated on

TMC नेते स्वपन माझी यांची आज सकाळी पश्चिम बंगालच्या (West Bengal) दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्याच्यासोबत आणखी दोन जणांना देखील गोळ्या लागल्या, त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी तृणमूल नेते आपल्या दोन साथीदारांसह घरातून दुचाकीवरून निघाले असताना हा खून करण्यात आला. (3 killed including TMC leader in indiscriminate firing Police investigation begins)

Crime
केरळ उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'मुस्लिम महिला अल्पवयीन मुलाची पालक असू शकत नाही'

यादरम्यान काही लोकांनी मोटारसायकल थांबवून अंदाधुंद गोळीबार करून तिथून पळ काढला. गोळी लागल्याने टीएमसी नेता आणि त्यांचे दोन साथीदारांचा जागीच मृत्यू झाला. सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळावरून काडतुसे आणि बॉम्ब जप्त करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.

स्वपन माझी हे टीएमसीचे नेते असून स्थानिक पंचायतीचे सदस्य देखील होते. कॅनिंग पश्चिम येथील टीएमसी आमदार परेश राम दास यांनी सांगितले की, मारेकऱ्यांनी प्रथम टीएमसी नेत्यासह तीन जणांना गोळ्या घातल्या आणि नंतर त्यांचे डोके कापण्याचा प्रयत्न केला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “तीन जण ठार झाले आणि तपास सुरूच आहे.

स्वपन माझी, झंटू हलदर आणि भूतनाथ प्रामाणिक अशी तीन मृतांची नावे आहेत. आज सकाळी 9 च्या सुमारास हे तिघे स्थानिक टीएमसी कार्यालयाकडे जात असताना ही घटना घडली आहे. 21 जुलै रोजी दक्षिण 24 परगणामध्ये टीएमसीची रॅली होणार आहे आणि त्याच्या तयारीसाठीच स्वपन माझी त्याच्या साथीदारांसह बाहेर गेले चालले होते.

Crime
CBIला दणका! ओमप्रकाश चौटालांच्या याचिकेवर दिल्ली HCने बजावली नोटीस

केनिंगच्या गोपाळपूर पंचायतीचे स्वपन माझी सदस्य होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकल थांबवली, आणि त्यात स्वपन माझीसह तिघेजण होते. आधी त्यांनी माझी यांना गोळ्या घातल्या आणि नंतर हलदर आणि प्रामाणिक यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही गोळ्या झाडल्या. त्यांची हत्या केल्यानंतर त्यांचा गळा चिरण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला.

आमदार परेश राम दास म्हणाले की, 'स्वपन माझी मंगळवारी रात्री माझ्याकडे आले आणि म्हणाले की माझी हत्या होऊ शकते. मी त्याला गुरुवारी दुपारी येण्यास सांगितले जेणेकरुन मला पोलिसांशी बोलता येईल आणि त्याची काही सुरक्षा व्यवस्था करता येईल.

एकीकडे टीएमसीने या घटनेसाठी भाजपला जबाबदार धरले, तर त्याच भाजपने हा आपल्या अंतर्गत कलहाचा परिणाम असल्याचे म्हटले. टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले की, “आम्ही या प्रकरणी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच हा टीएमसीवर हल्ला आहे.

Crime
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्टील मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला

भाजपला आमचा पक्ष कमकुवत करायचा आहे आणि राज्याची प्रतिमा खराब करण्याचाही त्यांचा यातून प्रयत्न आहे. ते हिंसाचाराचा अवलंब करतात आणि नंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळत असल्याची तक्रार करत असतात. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले की, लहान मूलही टीएमसीच्या या सिद्धांतावर विश्वास ठेवणार नाहीये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com