Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: रिक्षाचालकानं पोलिसांचा काढला घाम, जो समोर येईल त्याला ठोकलं; पाहा व्हिडीओ

Punjab: व्हिडीओमध्ये पोलिसांनी एका ई-रिक्षा चालकाचा 6 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. असे असतानाही रिक्षाचालक पकडला गेला नाही.

दैनिक गोमन्तक

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पंजाबमधील अमृतसरचा आहे. व्हिडीओमध्ये पोलिसांनी एका ई-रिक्षा चालकाचा 6 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. असे असतानाही रिक्षाचालक पकडला गेला नाही.

रिक्षाचालक दारुच्या नशेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आता संपूर्ण प्रकरण जाणून घेण्याआधी, दारुच्या नशेत असलेल्या ड्रायव्हरने पोलिसांना कसं पळवलं, ते तुम्ही व्हिडीओमध्येच पाहा...

पोलिस आणि ई-रिक्षा चालकात धरपकड

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पोलीस एका रिक्षाचालकाचा पाठलाग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचवेळी ई-रिक्षाचालक आपली गाडी सुसाट वेगाने चालवतो. व्हिडीओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, तो एका बाईकस्वाराला धडकतो, ज्यामुळे बाईकस्वार खाली पडतो.

पोलिसांनी (Police) अनेकवेळा प्रयत्न करुनही ई-रिक्षाचालक थांबण्याचे नाव घेत नाही. तो वेगाने एका गल्लीत जातो, जिथे तो सायकलस्वारालाही धडकतो. त्यानंतर तो रिक्षा सोडून पळून जातो. रिक्षाही रस्त्यावर उलटल्याचे व्हिडीओच्या शेवटी तुम्हाला दिसेल.

नेमकं प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. अमृतसरच्या (Amritsar) लॉरेन्स चौकातून या घटनेला सुरुवात झाली. ड्रायव्हर एका वृद्ध जोडप्यासोबत ग्रीन एव्हेन्यूला जाणार होता, पण तो इतका मद्यधुंद होता की, रिक्षा लॉरेन्स रोडवर फिरत राहिली.

दरम्यान, याबाबतची माहिती जोडप्याने पोलिसांना दिली असता रिक्षाचालकाला पकडण्यासाठी पोलिसांनी पाठलाग केला, त्यानंतर तो पळू लागला.

पोलिसांनी सांगितले की, 'आम्हाला रिक्षाचालकाला थांबवायचे होते, जेणेकरुन तो मद्यधुंद अवस्थेत इतर कोणालाही धडकू नये किंवा स्वत:ला जखमी करु नये.' पोलिसांनी रिक्षा ताब्यात घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT