Viral Video: '15 सेकंदाची रील पडली 31,000...', बाईक चालवताना तो पीत होता बीअर !

Shocking Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक चित्र-विचित्र फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ उत्तर प्रदेशातून समोर आला आहे
Raider
RaiderDainik Gomantak
Published on
Updated on

Shocking Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक चित्र-विचित्र फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ उत्तर प्रदेशातून समोर आला आहे, जो व्हायरल झाल्यानंतर 'गाझियाबाद ट्रॅफिक पोलिसांनी' अशी कारवाई केली आहे की, आता ती व्यक्ती बाईक चालवताना चुकूनही असा स्टंट करणार नाही.

वास्तविक, हा व्यक्ती हेल्मेटशिवाय बाइक चालवत असताना बिअर पीत होता आणि इंस्टाग्राम (Instagram) रील बनवत होता. जेव्हा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हा वाहतूक पोलिसांनी त्याला 31,000 रुपयांचा दंड ठोठावला, ज्यामध्ये हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्याबद्दलच्या दंडाचाही समावेश आहे.

Raider
Video Viral : "मी तलावात उडी मारुन आत्महत्या करेन !" शाहरुखचा डाय हार्ड फॅन असं का म्हणाला?

दुसरीकडे, हा व्हिडिओ 20 जानेवारी रोजी 'लोकेश राय' (@lokeshRlive) या ट्विटर हँडलने पोस्ट केला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'गाझियाबाद डीएम...येथे एक इसम बिअर पिऊन रील रेकॉर्ड करत आहे. गाझियाबाद ट्रॅफिक पोलिसांच्या फसव्या कारवाईचा पर्दाफाश केला आहे. इथे दिवसाढवळ्या असे शूटिंग सुरु आहे. मसुरी पोलिस स्टेशन परिसर.'

आत्तापर्यंत, या व्हिडिओला 100 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गाझियाबाद ट्रॅफिक पोलिसांनीही यावर प्रतिक्रिया दिली.

पोलिसांनी 31 हजारांचा दंड ठोठावला

'गाझियाबाद ट्रॅफिक पोलिसांनी' लिहिले- 'सर, ट्विटरवर आलेल्या तक्रारीची दखल घेत, 31,000 रुपयांचा दंड सदर वाहन चालकाला ठोठावण्यात आला आहे. इतर आवश्यकतेसाठी स्टेशन प्रभारी मसुरीला कळवण्यात आले आहे. कायदेशीर कारवाई केली आहे.' मात्र, यावरही अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या.

Raider
Sonu Sood Viral Video: गुटखा फेकून दे! टी-स्टॉलवर सोनू सूद पोहोचताच...

एका यूजर्सने लिहिले की, पोलिसांनी (Police) प्रतिसाद दिला नाही. तर दुसऱ्या यूजर्सने लिहिले की, दिल्ली पोलिसांपेक्षा तुम्ही लोक वेगाने कारवाई करता. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आहे?

येथे व्हिडिओ पाहा...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com