Haryana Crime Dainik Gomantak
देश

Haryana Crime: हरियाणात 'सेक्स्टॉर्शन' रॅकेटचा पर्दाफाश; 728 लोकांना जाळ्यात अडकावणारे 8 गजाआड!

Haryana Crime News: हरियाणामध्ये एका मोठ्या 'सेक्स्टॉर्शन' रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. एक-दोन नव्हे तर सुमारे 800 लोक या घाणेरड्या रॅकेटचे बळी ठरले.

Manish Jadhav

Haryana Crime News: हरियाणामध्ये एका मोठ्या 'सेक्स्टॉर्शन' रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. एक-दोन नव्हे तर सुमारे 800 लोक या घाणेरड्या रॅकेटचे बळी ठरले. वास्तविक, हरियाणा पोलीस 37 लाख रुपयांच्या सेक्सटोर्शनचा तपास करत होते. या तपासादरम्यान पोलिसांना एका मोठ्या रॅकेटची माहिती मिळाली. व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करुन हे लोक अश्लील व्हिडिओ दाखवून लोकांना ब्लॅकमेल करायचे. द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, भिवानीचे एसपी वरुण सिंगला यांनी सांगितले की, या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ठग व्हॉट्सॲप कॉलद्वारे लोकांना ब्लॅकमेल करायचे. आधी ते व्हिडिओ कॉल करायचे आणि नंतर त्या व्यक्तीचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचे. यानंतर ते बळी ठरलेल्या व्यक्तींचा चेहरा पॉर्न क्लिपमध्ये ट्रान्स्पोज करायचे आणि व्हिडिओ पाठवून त्यांना ब्लॅकमेल करायचे. आत्तापर्यंत आरोपींनी वेगवेगळ्या राज्यातील 728 हून अधिक लोकांना असे व्हिडिओ कॉल केले आहेत.

दुसरीकडे, दोन महिन्यांपूर्वी सेक्टर 13, भिवानी येथे राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीने तक्रार नोंदवली होती की, मला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आला होता. या फोन कॉलमध्ये एका मुलीने तिचे कपडे काढायला सुरुवात केली. त्यानंतर अचानक तिने कॉल डिस्कनेक्ट केला आणि काही वेळाने मला एक व्हिडिओ पाठवण्यात आला ज्यामध्ये मी नग्न मुलीच्या जागी दिसत होतो. त्यानंतर मला सतत फोन येऊ लागले. फोन करुन आरोपी स्वत:ला सीबीआय किंवा दिल्लीच्या गुन्हे शाखेचे अधिकारी सांगत होते. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम होतील, असेही ते फोन करुन बोलायचे.

दरम्यान, या वृद्ध व्यक्तीने आरोपींना दोन दिवसांत 36.84 लाख रुपये दिले होते. यानंतर आरोपींनी 20 लाखांची मागणी सुरु केली. त्यानंतरच त्यांनी संपूर्ण हकीकत घरच्यांना सांगितली. यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. मोबाईल फोन ट्रेस केला असता तो राजस्थानचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर आठ जणांना अटक करण्यात आली. सायबर तपासणीसाठी 19 मोबाईल पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून आतापर्यंत तीन कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT