Varun Gandhi Dainik Gomantak
देश

'देश के आर्थिक शत्रुओं पर रहमदिली...': वरुण गांधींनी मोदी सरकारला दिला घरचा आहेर

उत्तर प्रदेशातील पिलीभीतमधून भाजपचे लोकसभा खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर निशाणा साधला आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशातील पिलीभीतमधून भाजपचे लोकसभा खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर निशाणा साधला आहे. कोट्यवधी रुपयांचा कथित घोटाळा करुन परदेशात पळून गेलेल्यांवरुन गांधींनी केंद्र सरकारवर (Central Government) हल्लाबोल केला. (Varun Gandhi Has Once Again Criticized The Central Government)

गांधी म्हणाले की, '7 वर्षांत सरकार त्यांच्याकडून पुरेशी वसुली करु शकले नाही.' विजय मल्ल्या (Vijay Mallya), नीरव मोदी (Nirav Modi), मेहुल चोक्सी (Mehul Choksi) आणि ऋषी अग्रवाल यांची नावे घेत केंद्र सरकारला घेरले आहे.

त्यांनी ट्विट करत पुढे म्हटले की, 'गेल्या 7 वर्षात 67 हजार कोटींची चोरी करुन देश सोडून गेलेल्यांवर आपेक्षित करावाई करण्यात आलेली नाही. बचत खात्यावरील व्याजदर आज ऐतिहासिकदृष्ट्या नीचांकी पातळीवर असताना देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे.'

दरम्यान, विजय मल्ल्या यांच्यावर अनेक बँकांकडून घेतलेले सुमारे 9,000 कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याचा आरोप आहे. दुसरीकडे नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेत 14000 कोटी रुपयांहून अधिकचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. अलीकडेच, ABG शिपयार्ड लिमिटेडचे​माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी अग्रवाल यांचे नाव 22,842 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यात जोडले जात आहे.

शिवाय, विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि ऋषी अग्रवाल यांच्यावर निशाणा साधताना वरुण गांधी म्हणाले की, 'हे लोक आपले जीवन आनंदाने जगत आहेत. मात्र सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: भोमा येथील रस्त्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सावंत यांचे स्पष्टीकरण नाही

SCROLL FOR NEXT