Varun Gandhi Dainik Gomantak
देश

Varun Gandhi: वरुण गांधींचा मोठा दावा, दोनदा मंत्रीपदाची ऑफर आली होती...!

BJP: दरम्यान, वरुण गांधी यांनी मोदी सरकारच्या दोन्ही कार्यकाळात कोणतेही मंत्रीपद भूषवलेले नाही.

Manish Jadhav

Varun Gandhi News: उत्तरप्रदेशातील पिलीभीतचे भाजप खासदार वरुण गांधी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत. त्यांच्याबद्दल अशी अटकळ बांधली जात आहे की, ते त्यांच्या पक्षावर नाराज आहेत, त्यामुळे ते राज्य आणि केंद्र सरकारच्या कामकाजाविरोधात वक्तव्ये करुन प्रश्न उपस्थित करत आहेत.

दरम्यान, वरुण गांधी यांनी मोदी सरकारच्या (Modi Government) दोन्ही कार्यकाळात कोणतेही मंत्रीपद भूषवलेले नाही. आता वरुण गांधी यांनी केंद्रातील मंत्रीपदाबाबत मोठा दावा केला आहे. वरुण म्हणाले की, मला दोनदा मंत्री बनण्यास सांगितले होते, पण मी ते नाकारले.

"मी दोनदा मंत्रिपद नाकारले आहे, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही," असे खासदार वरुण गांधी यांनी 'न्यू इंडियन एक्सप्रेस'च्या कॉन्क्लेव्ह दरम्यान सांगितले.

वरुण गांधी यांना जेव्हा विचारण्यात आले की, तुम्ही जर शिक्षणमंत्री असता तर तुम्ही कोणत्या चार गोष्टी केल्या असत्या, तेव्हा ते म्हणाले की, 'सर्वप्रथम मी अभ्यासक्रम बदलला असता, आणि शिक्षकांची संख्या वाढवली असती. त्यानंतर त्यांच्या कौशल्यावरील खर्च वाढवला असता.' ते पुढे म्हणाले की, दक्षिण कोरियातील (South Korea) 94% लोकांच्या तुलनेत केवळ 4% भारतीय कर्मचारी कुशल आहेत.

दक्षिण कोरिया किंवा जर्मनीसारखे व्यावसायिक शिक्षण वाढवले ​​असते, असेही ते म्हणाले. “एकदा तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण केले की, तुम्हाला व्यावसायिक शिक्षणासाठी तीन ते पाच वर्षे लागू शकतात. या काळात तुम्ही कंपन्यांमध्येही काम करु शकता.” असेही गांधी म्हणाले.

शेवटी गांधी म्हणाले की, 'सर्व तरुणांनी हे जाणून घेतले पाहिजे की, गेल्या पाच वर्षांत निर्माण झालेल्या सर्व सरकारी नोकऱ्यांपैकी 79% कंत्राटी नोकऱ्या आहेत. त्या खऱ्या नोकऱ्या नाहीत, त्यांना पेन्शन नाही, त्यांना कोणतेही सामाजिक सुरक्षा फायदे नाहीत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिम भारतात? UNच्या रिपोर्टवर भारताचा तीव्र आक्षेप, कडक शब्दात ताकीद देत केला थेट सवाल

North Goa Final Voter List: उत्तर गोव्याची अंतिम मतदारयादी 4 जानेवारीला; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

Bhuvneshwar Kumar World Record: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात कमबॅक! तब्बल 1,430 दिवसांनंतर केली गोलंदाजी, पहिल्याच 2 चेंडूंवर नोंदवला विश्वविक्रम

Goa Under 23 Cricket: दिशांक मिस्कीनची एकाकी झुंज! नाबाद 97 धावांसह गोव्याला बिहारविरुद्ध विजयाची संधी

Ranji Trophy 2026: 40 पैकी 38 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या; गोव्याच्या फलंदाजांची रणजीत दयनीय अवस्था

SCROLL FOR NEXT